📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——
◆ अयोध्येला जाणार्या सर्व फ्लाईट फुल्ल
◆ अयोध्येसाठीच्या विमान तिकीट दरात वाढ
◆ 20 ते 25 हजारात तिकीट विक्री
◆ अयोध्येतील सर्व हॉटेल्स फुल्ल
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये होणार्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुंबईहून अयोध्येला जाणार्या सर्व विमानांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. 20 आणि 21 जानेवारीच्या विमान तिकीट दरात मोठी वृद्धी झाली आहे. जास्त नफा कमवण्यासाठी एका विमान कंपनीने आपली तिकीट रिझर्व ठेवली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, येत्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला जाणार्या विमान सेवांची बहुतेक उड्डाणे फुल्ल झाली आहेत. इंडिगो या विमान कंपनीची 15 जानेवारीपासून सुरू होणार्या उड्डाणासाठी 21 आणि 21 जानेवारीची विमाने फुल्ल झाले आहेत. या दोन दिवसांची तिकीट विक्रीत वाढ होत असल्याचे लक्षात येताच विमान कंपन्यांनी 20 ते 22 हजार रुपयांच्या दराने प्रत्येक तिकीट विकले.15, 16 आणि 17 जानेवारी पर्यंतचे नॉर्मल तिकीट भाडे साडे सहा हजार रुपये इतके होते. 18 जानेवारीचे भाडे 10 हजार रुपयांपर्यंत पोहचले तर 19 आणि 20 जानेवारीचे भाडे 20 हजार 600 रुपयांपर्यंत पोहचल्याचे ट्रॅव्हल एजंटांचे म्हणणे आहे. काही एजंटांच्या मते 21 जानेवारीची सर्व तिकिटे विकली गेली असून. त्यांचा दर 22 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.22 जानेवारीला अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर अति महत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन होणार असल्याने सर्वसामान्यांसाठी विमान उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु 22 जानेवारी नंतरही अयोध्येला जाणार्या प्रवाशांची गर्दी कायम आहे. प्रवाशांची ही गर्दी लक्षात घेता जास्त नफा कमावण्यासाठी एअरलाइन्स या विमान कंपनीने 20 आणि 21 तारखेची बहुतेक तिकिटे रिझर्व्ह ठेवली आहेत.
मुंबईहून व्हाया दिल्ली अयोध्येला जाणार्या तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. व्हाया दिल्ली अयोध्येचे तिकीट पंधरा हजार रुपये एवढे झाले आहे. ट्रॅव्हल एजंटांच्या मतानुसार जसजशी 22 जानेवारी ही तारीख जवळ येत आहे तसतसे विमान भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.