📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ 58 लाख 10 हजारांचा गुटखा जप्त
◆ ट्रॅव्हल्स बसमधून तंबाखू व गुटखा तस्करीचा पर्दाफाश
◆ जालना पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
◆ राजनिवास पान मसाला आणि सुवासिक केशर जर्दाचा समावेश
◆ 1 कोटी, 10 हजार, 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त
——-
विशेष प्रतिनिधी, जालना
जालनामध्ये बंदी असलेल्या गुटख्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी मोठी कारवाई केली. राजनिवास पान मसाला आणि सुवासिक केशर जर्दा याशिवाय ज्याची किंमत 58 लाख, 10 हजार, 760 रुपये आहे, एक कंटेनर ज्याची किंमत 42 लाख रुपये आहे, असा एकूण 1 कोटी, 10 हजार, 760 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
‘दै. मुंबई मित्र’ मागील 7-8 महिन्यांपासून गुटख्याचा पाठपुरावा करत आहे. ‘दै. मुंबई मित्र’ने गुटख्याचे महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील गुटखा तस्करांची मोडस ऑपरेंडी ‘दै. मुंबई मित्र’ने प्रकाशीत केली आहे. फक्त बातमी प्रसिध्द न करता याबाबतच्या अधिकृत तक्रारी सुध्दा ‘दै. मुंबई मित्र’ने राज्य सरकार व पोलीस
प्रशासनाला केल्या आहेत.
त्याचाच परिणाम म्हणजे मागील 2 महिन्यात राज्यभरात गुटख्यावर कारवाया होत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना प्रतिबंधित गुटख्याने भरलेला कंटेनर (एचआर 38 एबी 1326) देऊळगाव राजा येथून जालन्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. असायचे. त्यावर खनाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह गोंदेगाव आवारातील जगदंबा ढाब्यासमोर सापळा रचला.
कंटेनर येताच त्यांनी कंटेनर थांबवून चालक गफ्फार खान वय 50 रा. डुंगरपूर, जिल्हा पलवल, हरियाणा याची चौकशी केली. त्यानंतर त्याने इंदूर (मध्य प्रदेश) येथून गुटखा आणल्याचे सांगितले. कंटेनरमध्ये विविध
प्रकारचा गुटखा होता, तो
कर्नाटकात नेण्यात येणार होता.
कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये राज निवास पान मसाला व सुवासिक केशर जर्दा गुटखा आढळून आला.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई, पोलिस निरीक्षक खनाल, पोलिस अधिकारी कृष्णा टांगे, सचिन चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश राठोड, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, सचिन राऊत, चालक धम्मपाल सुडकर यांनी केले.
