नवी दिल्ली
महिला वैमानिकांच्या संख्येच्या बाबतीत भारताने जगातील सर्वात श्रीमंत देश मानल्या जाणार्या अमेरिकेला देखील मागे टाकले आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वुमन एअरलाइन पायलट्सच्या मते, जागतिक स्तरावर महिला वैमानिकांची टक्केवारी भारतात सर्वाधिक आहे.
एकूण महिला वैमानिकांपैकी 12.4 टक्के महिला वैमानिक भारतात आहेत. युएस जगातील सर्वात मोठे विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी महिला वैमानिकांची संख्या 5.5 टक्के आहे. तर युकेमध्ये 4.7 टक्के आहे. अधिक महिलांना कामावर घेतल्याने एअरलाईन्सला मनुष्यबळाच्या कमतरतेवर मात करण्यास मदत झाली आहे, असे मत ब्लूमबर्गच्या अहवालात मांडले गेले आहे.
पुढील दोन दशकांत जगाला 6 दशलक्षाहून अधिक नवीन पायलटची गरज भासणार आहे, असा बोइंग कंपनीचा अंदाज आहे. महिला वैमानिकांची कामगिरीही चांगली असल्याचे आत्तापर्यंत दिसून आलेले आहे. महिला वैमानिकांना मोठ्या प्रमाणात कामावर घेतल्यामुळे विमान कंपन्यांच्या प्रवासातील व्यत्यय दूर झाले आहे. मनुष्यबळाच्या कमतरेतवर यामुळे मात करता आली.
तीन दशकांपूर्वी बोटावर मोजण्याइतक्याच महिला पायलट
आज महिला वैमानिकांच्या बाबतीत भारत जगासमोर उदाहरण आहे. पण तीन दशकांपुर्वीची परिस्थिती वेगळी होती. उदाहरणार्थ, 1989 मध्ये, भारताच्या निवेदिता भसीन जगातील सर्वात तरुण व्यावसायिक एअरलाइन कॅप्टन बनल्या. भसीन सांगतात की, जेव्हा ती पायलट बनले. तेव्हा चालक दल मला लवकरात लवकर कॉकपिटमध्ये जाण्याची विनंती करत असे.
जेणेकरून प्रवाशांना हे कळू नये की त्यांचे विमान एक महिला चालवत आहे. जेणेकरुन प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये.