📰 MUMBAI MITRA IMPACT
——-
◆ इंदोरमध्ये गुटख्याच्या ट्रकमधून दारूची तस्करी
◆ गुटख्याची 123 पोती जप्त
——-
विशेष प्रतिनिधी, इंदोर
इंदोरमधील झोन-1चे अतिरिक्त डीसीपी आलोक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या क्रमांकाच्या आधारे एअरोड्रोम आणि राऊ पोलीस ठाण्याच्या पथकाने गुजरातकडे जाणार्या सर्व मार्गांवर विशेष पथके तैनात केली आणि एअरोड्रोम राऊ पोलीस स्टेशनने सुपर कॉरिडॉरवर अहमदाबादला जाणारा मद्य घेऊन जाणारा ट्रक पकडला. विशेष म्हणजे या ट्रक मध्ये गुटख्याच्या पोत्यांच्या मधोमध दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. ही कारवाई म्हणजे ‘दै.मुंबई मित्र’च्या गुटखाविरोधी मोहिमेचा ‘इम्पॅक्ट’ समजला जातो.
पोलीस सूत्रानुसार, इंदोर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. संशयाची सुई आमदाराच्या जवळच्या व्यक्तीकडे वळत आहे. लाखोंची जप्त केलेली दारू गुटख्याच्या पोत्यांमध्ये ठेवून अहमदाबादला पाठवली जात होती. झोन-1चे अतिरिक्त डीसीपी आलोक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आठ दिवसांपूर्वी ही माहिती मिळाली होती. ट्रकच्या क्रमांकाच्या आधारे एअरोड्रोम आणि राऊ पोलीस ठाण्याचे पथक त्याचा पाठलाग करत होते. गुजरातकडे जाणार्या सर्व मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आली होती. टीआय राजेश साहू यांनी बुधवारी दुपारी सांगितले की, पोलिसांनी ट्रक (एमएच 18 बीए 0089) सुपर कॉरिडॉरवर पकडला. ट्रकमध्ये गुटखा व गोड सुपारीची पोती असल्याचे ट्रकचालक जितेंद्र वास्कळे यांनी सांगितले.
ते अहमदाबादला जात होते. पोलिसांनी गोण्यांची तपासणी केली असता त्यांना दारूचा वास आला. त्यावर संशय बळावला आणि ट्रक रिकामा करण्यात आला. गुटखा आणि सुपारीच्या 123 पोत्यांमध्ये दारूचे 300 बॉक्स ठेवण्यात आले होते. एडीसीपीनुसार, जप्त केलेल्या दारूची किंमत 20 लाख रुपये आहे.
चालकाने पोलिसांना सांगितले की, ट्रक अंबिका ट्रेडर्सने सावर रोड येथील मां सुंदरा शक्ती फूड प्रॉडक्ट्समधून भरला होता. चालकाच्या मोबाईलमध्ये ऑडिओ क्लिप सापडली आहे. यामध्ये, शासकीय परिवहन (अहमदाबाद) च्या ऑपरेटरशी संभाषण रेकॉर्ड केले आहे. दारू रिकामी करताना ते बोलत होते. देवास नाका येथे दारू भरल्याचे चालकाने सांगितले.
ट्रान्सपोर्टरच्या वॉचमनने त्याच्याकडे चावी दिली होती.