बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील वकाना येथे एका 34 वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. सिद्धार्थ वसंता गव्हांदे असे आत्महत्या करणार्या युवकाचे नाव आहे. सिद्धार्थ कोणालाच न सांगता सकाळी घरून निघून गेला होता. गावात त्याच्या नातलगांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दुपारी वकाना शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सिद्धार्थ आढळला. त्याने दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला होता. त्यानंतर सदर घटनेची माहिती सिद्धार्थच्या नातेवाईकांनी तामगाव पोलिसांना दिली.