नगर : पुणे-नागपूर या गरीब रथ रेल्वेमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचा निनावी फोन आला होता. त्यानंतर रेल्वे पोलिस व नगर पोलिसांनी रेल्वेची कसून तपासणी केली. त्यात बॉम्ब अथवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही केवळ अफवाच असल्याने पोलिसांसह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गरीब रथ ही गाडी शनिवारी सांयकाळी पुणे येथून सुटली होती. ही गाडी सुटल्यानंतर काही वेळाने पुणे पोलिसांना एक निनावी फोन आला. गरीब रथ गाडीमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचा फोन होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी तातडीने नगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यामुळे शनिवारी रात्री सवानऊपासून आरपीएफ, जीआरपीएफ, नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके हे रेल्वे स्टेशन येथे आले होते.