📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ राजेश वाला उर्फ राजेश शेट्टीयार पुन्हा ऍक्टीव्ह?
◆ पालघर पोलीसांसाठी महिना 19 लाख रुपयांचा व्यव्हार?
◆ धीरजकडे कल्केशनची जबाबदारी तर; नव्या धंद्याला शफीचा फायनानस?
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
तब्बल 1 कोटी 11 लाख 16 हजार रुपयांच्या गुटखा तस्करीप्रकरणी पालघर पोलिसांच्या हद्दीतील मनोर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात ट्रक चालक मालकासह एक आरोपी असलेला राजेश वाला उर्फ राजेश शेट्टीयार हा गुटखा तस्करीमध्ये पुन्हा सक्रीय झाल्याचे सूत्रांकडून कळते. राजेश वाला हा मोठा गुटखा तस्कर असून तो महाराष्ट्रात गुटखा वाहतूक करून घेतो. मध्यंतरी महाराष्ट्र पोलिसांच्या गुटखा विरोधी कारवाया वाढल्यामुळे तसेच गुटखा तस्करांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाल्याने राजेश वाला हा थंड बसला होता. मात्र आता पुन्हा त्याने गुटखा तस्करी सुरू केली असल्याचे समजते. मुख्यत्वे राजश्री, विमल, सिग्नेचर, कॅशचे काम त्याने घेतले असून, पालघर पोलीसांसाठी महिना 19 लाख रुपयांचा व्यव्हार ठरला याची जबाबदारी पोलीस खात्यात्यातील ‘भरत’ वा ‘भारत’ कडे असल्याचे समजते. धीरजकडे कल्केशनची जबाबदारी असून या संपुर्ण नव्या धंद्याला शफीचा फायनानस असल्याचे सुत्रांकडून समजते. दिलबागचा डिस्ट्रीब्युटर असलेल्या शफी ने आता ‘गोवा 1000’चे काम ही हाती घेतल्याचे समजते.
11 सप्टेंबर 2023 रोजी ‘दै. मुंबई मित्र’च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘दै.मुंबई मित्र’च्या गुटखा विरोधी मोहिमेला चांगलेच यश मिळत असून सातत्याने गुटखा पकडल्याचे वृत्त येत आहे. ‘दै. मुंबई मित्र’ने ऑपरेशन गुटखा’ मोहिमेअंतर्गत गुटख्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याचेही जाहीर केल्यानुसार, मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालघर पोलिसांच्या मदतीने ‘स्टिंग ऑपरेशन’ करून सुमारे 1 कोटी 11 लाख रुपये किंमतीचा ‘राज निवास’गुटखा असलेला ट्रक पकडला. विशेष म्हणजे एफआयआरमध्ये ट्रक चालकासह ट्रकचा मालक आणि सहा गुटखा माफियांची नावेही नोंदविण्यात आली आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्री गुटख्याचा ट्रक राजस्थानातून गुजरातमार्गे हायवेवरून मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुंबईच्या दिशेने येणार असल्याची गुप्त माहिती ‘दै.मुंबई मित्र’ला मिळाली. ‘दै.मुंबई मित्र’ने ही माहिती पोलिसांनी कळवली. मनोर पोलिसांनी रात्री मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिल्लर फाटा येथे गुजरात लेन,जोनपूर ढाबा येथे सापळा रचला. गुटख्याबरोबरच पोलिसांनी 17 लाख रुपये किमतींचा ट्रकही ताब्यात घेतला. अशाप्रकारे 1 कोटी 11 लाख 16 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मनोर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या घटनेतील आरोपी राजेश वाला उर्फ राजेश शेट्टीयार हा मध्यन्तरी थंड बसला होता. परंतु तो आता गुटखा तस्करीमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते.गुटखा तस्करी प्रकरणी ‘दै.मुंबई मित्र’ने आतापर्यंत केलेले सर्व दावे तंतोतंत खरे ठरले आहेत.त्यामुळे या वृत्ताचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. अशी नागरिकांची मागणी आहे.