📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——
◆ आशुतोष डुंबरे यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला!
◆ महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महिलांची त्यातही अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार त्यांची सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्स या गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुरुवारी दिली. मावळते आयुक्त जयजित सिह यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
जयजित सिहं यांची राज्याच्या लाच लुचपत विरोधी पथकात महासंचालक म्हणून बदली झाली होती. त्यांच्या जागी आता राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक डुंबरे यांची 25 वे आयुक्त म्हणून ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे. आज दुपारी त्यांनी जयजित सिहं यांच्याकडून ठाण्याची सूत्रे घेतली. आशुतोष डुंबरे हे 1994 सालच्या बॅचचे आयपीएस असून त्यांनी यापूर्वी ठाणे शहराचे सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असल्याने ठाण्यात तसे काम मोठे आहे. ठाण्यात तसे चॅलेंजिंग टास्क आहे. आता ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती आम्ही घेतली आहे.
भौगोलिक रचना संस्कृतीक दृष्ट्या ठाणे एक सुंदर शहर आहे. ठाणेकरही समजूतदार आहेत. येत्या दोन तीन दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल. ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी यांची आधी माहिती घेऊन त्यावर भाष्य करणे योग्य राहील. विकासासाठी ठाण्याची ओळख आहे. पूर्वीच्या तुलनेत आता या ठिकाणी खूप विकास झाला आहे.
या आधी ठाण्यात काम केले आहे. त्याचाही चांगल्या प्रकारे खूप उपयोग होईल महिला सुरक्षा,वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्स यावर खास नजर ठेवणार आहे. पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घरांबाबतही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
फोटो कॅप्शन
– नवनियुक्त ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मावळते आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला.
प आशुतोष डुंबरे यांचा जन्म पुणे तालुक्यातील जुन्नरमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडिल दोघेही शिक्षक होते. डुंबरे यांनी नांदेडच्या गुरूगोविंद सिंह अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियरींगची पदवी घेतली.