प प्रतिनिधी
नाशिक
देवळा तालुक्यातील मेशी येथून जाणार्या महाल-पाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दहीवड येथील पानसरे कुटुंबीयांनी नियोजित केलेला विवाह समारंभ अमरावतीपाडा येथे होणार होता. त्यासाठी दहीवड येथील जनार्दन देवरे हे पत्नी उज्ज्वलासह दुचाकीने गेले होते. तर रण्यादेवपाडा येथील गुलाब सोनवणे हे पत्नी सरला मुलगा किरण आणि भाचा कार्तिक पवार यांच्यासह दुचाकीने मेशी येथे आले होते.