📰 MUMBAI MITRA वेध निवडणुकीचा!
——-
◆ अखेर महाविकास आघाडीतून ‘वंचित’ बाहेर : स्वतंत्र यादी जाहीर
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेले काही दिवस राज्यातील महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेले ‘वंचित बहुजन आघाडी’ अखेर आघाडीतून बाहेर पडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे वंचितची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे शिवसेनेने (ठाकरे गट) आपल्या 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सेनेने दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य मुंबई या दोन जागांवरील काँग्रेसचा दावा फेटाळत तिथे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आघाडीमध्ये सर्व काही ‘ऑलवेल नसल्याचा प्रत्यय येत आहे.
ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी जाहीर
शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 जागांवरच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यामान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर काही नव्या चेहर्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत, त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे. संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या यादी ट्विट केली आहे. 17 लोकसभा उमेदवारांची यादी ट्विट द्वारे जाहीर केली. मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करत या दोन जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या आहेत.
– बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
– यवतमाळ- संजय देशमुख
– मावळ – संजोग वाघेरे- पाटील
– सांगली -चंद्रहार पाटील
– हिंगोली- नागेश अष्टीकर
– छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
– धाराशीव- ओमराजे निंबाळकर
– शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
– नाशिक- राजाभाऊ वाझे
– रायगड – अनंत गिते
– रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
– ठाणे- राजन विचारे
– मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
– मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
– मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
– मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
– परभणी- संजय जाधव
***
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये नवीन ट्वीस्ट निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला असून, स्वतंत्ररित्या लढण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचितची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवला होता.
वंचित बहुजन आघाडी कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कमिटीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिली. वंचित त्यांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीला अकोल्यातून उमेदवारी मिळवली होती. यंदाही प्रकाश आंबेडकर यांनी अकोलामधून उमेदवारी जाहीर केली. ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोरे मार्ग निवडला. त्याचा प्रकाश आंबेडकर यांना फायदा झाला. ओवैसींसोबत हातमिळवणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील काही जागांवर विजय मिळवला होता. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत वंचितला दारूण पराभव सहन करावा लागला होता.
– अकोला – प्रकाश आंबेडकर
– भंडारा-गोंदिया – संजय केवट
– गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
– चंद्रपूर – राजेश बेले
– बुलडाणा – वसंत मगर
– यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार
– वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके
– अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान