📰 DAILY MUMBAI MITRA EXPOSE
———
◆ आळेफाटा पोलिसांनी पकडला 31 लाख 4 हजार रुपयांचा गुटखा
——-
विशेष प्रतिनिधी, पुणे
‘दै. मुंबई मित्र’ मागील 2 महिन्यांपासून ‘ऑपरेशन गुटखा’ मोहिमे अंतर्गत गुटखा माफियांचा संपूर्ण कच्चा-चिट्टा मांडत असून या मोहमेला मोठ्याप्रमाणात महाराष्ट्र व गुजरात तसेच राजस्थान या राज्यांतून पाठिंबा मिळत असून मोठ्याप्रमाणात राज्यभरात गुटखा तस्करांवर कारवाई सुरु आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातहून पुण्याकडे बेकायदा गुटख्याची वाहातुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुणे- नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर)गावच्या हद्दीत डोंगरे फर्निचर या दुकानासमोर नाकाबंदी केली असता, गुजरात हून आलेला एम.एच.17 के.ए.9717 हा टेम्पो पोलीसांना संशयितरित्या आढळून आल्याने टेंम्पो चालकाची चौकशी केली.
त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर सदरचा टेंम्पो चेक केला असता, त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या प्रतिबंधित असलेला विमल कंपनीची सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू, व आर.एम.डी. नावाची सुगंधित सुपारी असा एकुन 31 लाख 4 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने टेम्पो चालक ओंकार हिरामण सांडभोर (वय-22, राहणार सांडभोर वाडी, रा. राजगुरूनगर, जि. पुणे) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन, 46 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल टेंम्पो ट्रक सह जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, अनिल पवार, सहफौजदार चंद्रशेखर डुंबरे, विनोद गायकवाड, प्रल्हाद आव्हाड, पंकज पारखे, अमीत माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, राजेंद्र आमले, पोलीस मित्र नामदेव पानसरे यांनी केली. पुढील तपास सुनील बडगुजर हे करत आहेत. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी गुजरातहुन पुण्याकडे आलेला 9 लाख रुपयांचा गुटखा आळेफाटा पोलिसांनी पकडलेला असताना आज पुन्हा आळेफाटा पोलिसांनी 30 लाख रुपयांचा गुटखा पकडल्याने पोलीसांचे कौतुक होत आहे.
