*📰 MUMBAI MITRA EXPOSE*
——-
● *पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सावळा गोंधळ*
● कुपरमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता तर शताब्दीमध्ये टेक्निशियनच्या नोंदणीवरून मतभेद
—–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गरीब रुग्णांवर मोफत उपचारांसाठी बनवण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये खाजगीकरणाचे वारे सध्या जोरात सुरू आहे. या खाजगीकरणाबरोबरच पालिका रुग्णालयाच्या प्रशासकीय गोंधळामुळे गरीब रुग्णांच्या हालामध्ये आणखीनच भर पडली आहे. एकीकडे विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात निविदांच्या उशिरांमुळे स्थायी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथील रुग्णांचे गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात चिकित्सा अधीक्षक आणि लॅब टेक्निशियन यांच्यात महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल मध्ये (एमपीसी) अनिवार्य नोंदणी करण्याच्या मुद्द्यावर मतभेद सुरू असल्याने रुग्णांची कुचंबना सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, दीर्घ काळापासून स्थायी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या टीकेचा भडीमार सहन करणाऱ्या कूपर रुग्णालयाने वेगवेगळ्या श्रेणीमधील रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरती अभिनय सुरू केले आहे. या अभिनयानांतर्गत 39 विभागांमध्ये एकूण 145 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यां व्यतिरिक्त लॅब टेक्निशियन, असिस्टंट लॅब लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे असिस्टंट, पार्ट टाइम रिफ्रॅक्शनिस्ट, आया, सफाई कर्मचारी आणि इतर सहाय्यक पदांचा समावेश आहे. मात्र या नियुक्त्या तात्पुरता आणि कंत्राटी स्वरूपाच्या असतील असे मुंबई महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये कूपर रुग्णालयांच्या डॉक्टरांनी तात्कालीन डीन ना पत्र लिहून गंभीर मानव संसाधन संकटाकडे लक्ष वेधले होते. डॉक्टरांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की, याचा परिणाम थेट रुग्णालयाच्या सेवेवर होत आहे.
=====
*एक वर्षासाठी नियुक्त्या*
पालिका आयुक्तांच्या मंजुरीनुसार, या भरती अभिनयानांतर्गत करण्यात येणाऱ्या हंगामी नियुक्त्या 31 मार्च 2027 पर्यंत वैध असतील या भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक योग्यता तपासल्यावर इंटरव्यू घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. याने नियुक्त्या 89 दिवसांसाठी असतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी वाढवला जाणार आहे. हंगामी कर्मचाऱ्यांना केवळ ठरलेले मानधन मिळणार आहे. मात्र त्यांना महागाई भत्ता, घर भाडे भत्ता अथवा स्थायिक कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ दिले जाणार नाहीत.
—–
*5 टेक्निशियनस नोंदणीविना*
शताब्दी रुग्णालयाचे चिकित्सा अधीक्षकांच्या मते कंत्राटी आणि कायमस्वरूपी मिळून एकूण 18 लॅब टेक्निशियन रुग्णालयात कार्यरत आहेत. यापैकी पाच टेक्निशियनस महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिलमध्ये नोंदणीकृत नाहीत. वास्तविक पाहता सर्व टेक्निशियनसने नोंदणी अर्ज केले असून निर्धारित शुल्कापोटी प्रत्येकी दोन हजार रुपयेही भरले आहेत. परंतु पाच टेक्निशियनसच्या नोंदणी मध्ये अडथळे आहेत. त्यांच्याकडे मायक्रोबायोलॉजी मध्ये बीएससीची पदवी आहे. मात्र अशा महाविद्यालयाची पदवी आहे. जी महाविद्यालय स्वीकृत योग्यता आणि संस्थांच्या यादीमध्ये सामील नाहीत.
=====
● कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात चिकित्सा अधीक्षक आणि लॅब टेक्निशियन यांच्यामध्ये महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिलमध्ये (एमपीसी) सक्तीची नोंदणी या विषयावरून मतभेद झाले आहेत. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून पॅरामेडिकल काऊन्सिलमध्ये तक्रार करण्यात आल्यावर हे मतभेद अधिक तीव्र झाले. शताब्दी रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही लॅब टेक्निशियननी नोंदणीला विरोध केला आहे. कारण नोंदणी करिता आवश्यक असलेली पात्रता त्यांच्याकडे नाही.
● महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिलमध्ये तक्रारी झाल्यानंतर शताब्दी रुग्णालयाच्या चिकित्सा अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्देशांतर्गत रुग्णालय प्रशासनाने सर्व लॅब टेक्निशियनसना पॅरामेडिकल काऊन्सिलमध्ये सक्तीचे नोंदणी करण्याचे आदेश जारी केले. मात्र रुग्णालयात कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी आणि वरिष्ठ लॅब टेक्निशियनसने या नोंदणीचा विरोध केला आहे. त्यांच्या विरोधामुळे रुग्णालय प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे.







