बॉलिवूडमधील लिवूडमधील सदाबहार अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, त्यांच्या सर्वात लक्षात राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे नायक. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनेकांना आवडला. त्याची कथा सामान्य लोकांच्या मनाला इतकी भिडली की नंतर हा एक कल्ट चित्रपट बनला. नायकचे दिग्दर्शन तमिळ दिग्दर्शक शंकर यांनी केले होते. हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या तमिळ चित्रपट मुघलवनचा अधिकृत रिमेक होता. यामध्ये राणी मुखर्जी, परेश रावल, अमरीश पुरी, जॉनी लिव्हर आणि सौरभ शुक्ला सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी अभिनय केला होता. नायकने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. पण, आता २५ वर्षानंतर या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. सनम तेरी कसम हा हिट रोमँटिक चित्रपट बनवणारे निमति दीपक मुकुट यांनी “नायक २” ची पुष्टी केली आहे. त्यांच्याकडे या चित्रपटाचे कॉपीराइट आहेत. त्यांनी खुलासा केला की ते अनिल कपूरसोबत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. मुलाखतीत दीपक मुकुट म्हणाले, “अनिल कपूर आणि मी एकत्र हा चित्रपट बनवत आहोत. सध्या याबद्दल जास्त काही सांगणे घाईचे ठरेल, कारण यावर अनेक चर्चा सुरू आहेत. हो, नायकचा सिक्वेल येणार आहे आणि आम्ही दोघेही मिळून त्याची निर्मिती करणार आहोत. जवळजवळ २५ वर्षे झाली आहेत. प्रत्येक चित्रपटाचे स्वतःचे नशीब असते. जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा ते घडते आणि आम्हाला वाटले की आता ती वेळ आहे.








