पणजी, गोवा । २६ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र फिल्म, रंगमंच व सांस्कृतिक विकास महामंडल लिमिटेड (MFSCDCL) ने गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव भारत (IFFI २०२५) मध्ये आपली दमदार उपस्थिती नोंदवली आणि महाराष्ट्राला भारताची तसेच जागतिक पातळीवरील आघाडीची चित्रिकरण राजधानी म्हणून पुन्हा एकदा भक्कमपणे सादर केले. “महाराष्ट्र : चित्रिकरण स्थळ म्हणून आणि अंतर्दृष्टी” या विषयावरील विशेष पॅनल संधी चर्चेत MFSCDCL ने राज्याच्या चित्रपट–अनुकूल व्यवस्थेचे तीन मजबूत आधारस्तंभअधोरेखित केले देशातील सर्वात जलद एकखिडकी प्रणाली, मराठी चित्रपटांसाठी सर्वात उदार प्रोत्साहन पॅकेज आणि भविष्यकाळासाठी सज्ज विश्वस्तरीय पायाभूत सुविधा.
ऑनलाइन पोर्टल www.filmcell. maharashtra.gov.in ने १४ सरकारी विभाग व १०५ उप-विभागांना एकाच व्यासपीठावर आणले असून सर्व शूटिंग परवानग्या केवळ ७ कार्य दिवसांत देण्याची हमी दिली आहे; विलंब झाल्यास स्वयंचलित मान्यता (Deemed Approval) मिळते, ज्यामुळे प्रशासकीय अडथळे जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आले आहेत. मराठी चित्रपटांना राज्य सरकार रु. ४० लाखांपर्यंत अनुदान,
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे अनुदान दुप्पट, संपूर्ण महाराष्ट्रात १००% मनोरंजन करमाफी, चित्रनगरीसह राज्याच्या मालकीच्या संपत्तींवर सवलतीच्या दराने जागा, तसेच ‘अ’ श्रेणी किंवा राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त महिला दिग्दर्शिकांना विशेष रु. ५ लाख अनुदान असे बहुपदरी लाभ दिले जात आहेत.
मुंबईतील ५२१ एकरांवर पसरलेली दादासाहेब फाल्के चित्रनगरी विविध सेट्स व सुविधा पुरवते, तर चित्रनगरीत लवकरच उभारला जाणारा अत्याधुनिक अतऋउ (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स) केंद्र आणि FTII तसेच इतर प्रतिष्ठित संस्थांबरोबरचे कौशल्य विकास कार्यक्रम महाराष्ट्राला भविष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिद्ध करत आहेत.
IFFI २०२५ मध्ये व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती स्वाती म्हैसे पाटील म्हणाल्या, “IFFI २०२५ हे महाराष्ट्राच्या सर्जनशील सामर्थ्याचा आणि विकसित होत असलेल्या चित्रपट परिसंपरेचा जागतिक
Sur
sh Karni,maken
Moderator
Santosh Pathare, Secretary, Prabhat Chitra Mandal & Fesuval Director, Third Asian Film Festival
Speakers
Swati Mhase Patil, Managing Director, MFSCDCL (Film City, Mumbai)
Prashant Sajanikar, Joint Manas Direct, MFSCDCL (Film City, Mumba
व्यासपीठावर सादरीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण संधीचे ठिकाण आहे. उत्तम पायाभूत सुविधा, प्रगतीशील धोरणे आणि जागतिक स्पर्धात्मक वातावरण देऊन आम्ही चित्रपट निर्मात्यांना सक्षम करू इच्छितो.” महाराष्ट्र देश-विदेशातील निर्माते, दिग्दर्शक आणि सर्जनशील व्यावसायिकांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या हृदयस्थानी असलेल्या अनुपम संधींचा शोध घेण्यासाठी मनापासून आमंत्रित करतो.
माहितीसाठी परवानगी व प्रोत्साहनाबाबत अधिक : www.filmcell. maharashtra.gov.in किंवा filmcell@maharashtra.gov.in








