कुंडई : सर्व सौभाग्यवती स्त्रीयांनी
तपोभूमीवर तुलसी विवाह निमित्त भ्रतार पूजन संपन्न करून आपल्या यजमानाचा सन्मान केलेला आहे. ज्यावेळी नवऱ्याचा सन्मान होतो त्यावेळी बायको स्वतःला सन्मानित मानते. असं हे स्त्रीचं रूप अनंतकाळपर्यंत हिंदू धर्मामध्ये पाहत आलेलो आहोत. आपण केवढेही मोठे असलो तरी आपल्या घरातील स्त्री, माता आहे तिच्यापेक्षा या जगामध्ये मोठा कोणी नाही. हा आदर्श प्रभूरामचंद्रांनी आपल्या जीवनात दिला. वैभव संपन्न स्वर्ग जरी असला तरी जगात मातेशिवाय अन्य मोठं नातं नाही. जिथे आई, जन्मभूमी आहे तिच्यावर आपण प्रचंड प्रेम करतो. त्यासाठी स्त्रीचा सन्मान केला गेला आहे. पतिव्रता स्त्रीयांनी पतीचं पूजन केल्याने त्यांना अखंड सौभाग्य पतीमुळे लाभतं यासाठी त्यांनी भ्रतार पूजन केलेलं आहे. सर्वात मोठं व्रत पव्रितेचं आहे. आणि सनातन धर्मात आपली शास्त्र सर्वांना आनंददायक, प्रेरणादायक आहेत. त्यामुळे सनातन धर्मात ‘पतिव्रता’ हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री सदुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींनी केले.
कुर्यात् गढ़ा मंगलम
कुर्यात सदा मंगलम या कार्यक्रमात सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात भ्रतार पूजनात सहभागी झालेली दाम्पत्य.
श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा जगत
जननी द्वारे सदुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या गुरुपीठारोहण द्वितपःपूर्ती महोत्सवी वर्ष निमित्त
तुलसी विवाहाचे औचित्य साधून कुर्यात सदा मंगलम या कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर करण्यात आले होते.
याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.
ह्या कार्यक्रमात महिला पुरोहितांच्या पौरोहित्याखाली तुलसी विवाह विधी संपन्न झाला. व हजारोंच्या संख्येने हिंदू माता-भगिनींच्या उपस्थितीत पतिव्रता या विषयावर नारीशक्तीद्वारे महाचर्चा संपन्न झाली तसेच जगत जननी नारीशक्तीद्वारे दीप आराधना, तुलसी वृंदावन महात्म्य कथन, भ्रतार पूजन, दंपती पूजन तनंतर पूजनीय स्वामीजींचे दिव्य आर्शीवचन, आरती, दर्शन व मातृशक्तीचे अनोखे दर्शन घडवणारा कार्यक्रम थाटात संपन्न झाला. या सोहळ्यास दिगंबर कामत – सार्वजनिक बांधकाम मंत्री गोवाराज्य, डॉ. महेंद्र कुडचडकर ओथोपँडीक सर्जन, डॉ. अनुपमा कुडचडकर – त्वचा विशेषज्ञ, अक्षया राऊत – चार्टर्ड अकाउंटंट, स्नेहल वायंगणकर – स्ट्रक्करल कन्सल्टंट एम. ई. स्ट्रक्कर्स – गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, आशा कामत – समाज सेविका, अॅड्. ब्राह्मीदेवीजी अध्यक्षा, सत्गुरु फाउंडेशन, अॅड्. रश्मी नाईक -अध्यक्षा, जगत जननी आदि. अशा विविध क्षेत्रातील महनीय मान्यवर उपस्थित होते.








