वसईः दहसिर टोल नाका स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या टोल शुल्क नियमांनुसार नसल्याने त्याला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली नाही, असा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहिसर टोल नाका स्थलांतर करण्यास ब्रेक लागणार का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. असे असतानाच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या वेशीवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी हालचाली ही सुरू केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वसोर्वा पुलापलीकडच्या भागात पथकर नाका स्थलांतरित करण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव दिला
होता. मात्र वर्सोवा पुलाकडे टोल नाका स्थलांतरित करण्यास तेथील स्थानिकांनी विरोध दर्शविल्याचे वातावरण आणखीनच चिघळले. यात टोल नाका घोडबंदर व वर्सोवा येथे होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे शिंदे सेना व भाजप टोल नाका स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून आमने सामने आल्याचे चित्र दिसून निर्माण झाले होते. तर त्यातच ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ‘दहिसर टोल नाका स्थलांतराचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या टोल शुल्क नियमांनुसार नसल्याने त्याला मान्यता दिली नाही, असे ट्विट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट
काय म्हणाले सरनाईक ?
दहिसर टोल नाका स्थलांतरित झाल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरनाईक यांना याचे क्रेडिट मिळेल असे मिरा भाईंदरच्या काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्याला विरोध कसा करता येईल याचा विचार होत आहे. परंतु त्यात ते अपयशी ठरले आहेत. मी दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्यासाठी चांगल्या उपाययोजना आखल्या आहेत. येत्या ८ नोव्हेंबरला टोल नाका स्थलांतरित होईल. तसेच पुढील जागा मिळत नसल्यामुळे जी वाहतूक कोंडी होते, त्यावर ही उपाययोजना केल्या जातील अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली आहे.
तो मेसेज खोटा.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर जो संदेश पाठविण्यात आला आहे तो खोटा असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. याबाबत मी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी आम्ही असा कोणता संदेश पाठविला नाही असे सांगितले असून यात जे रस्ते विकास महामंडळाने जो प्रस्ताव दिला होता त्याला उत्तर दिले असून नेमकी कोणती जागा आहे ती आम्हाला दाखवा. जेणेकरून तसा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठविता येईल असे सांगण्यात आल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
केले. हा संदेश समाज माध्यमातून सर्वत्र प्रसारित होताच विविध प्रकारच्या चचांना उधाण आले होते. तसेच दहिसर टोल नाका स्थलांतर होण्यास ब्रेक लागला असल्याची
चर्चा सुरू झाली. पण, दहिसर टोलनाका स्थलांतरणावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मात्र आता याला नवीन वळण आले आहे.








