📰 MUMBAI MITRA MAG
——-
● स्वप्नांना नाचवणारा ;राहुल कांबळे
—–
डान्स इंडस्ट्रीत कोणतीही ओळख नसताना, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या राहुल कांबळे उर्फ कोरिओग्राफर RSK यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. वयाच्या सहाव्या वर्षी नृत्यस्पर्धांमधून सुरुवात करणाऱ्या राहुलला वडिलांनी सुरुवातीला विरोध केला. मात्र, त्याच्या नृत्यावरील प्रेमामुळे तो गुपचूप स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. काही वर्षांनी वडिलांचा अभिमान वाटू लागला, पण त्याचवेळी एक मोठा धक्का बसला वडिलांचं अचानक निधन झालं. घर चालवण्यासाठी राहुलने आईसोबत फॅक्टरीत काम केलं, पण आईच्या प्रोत्साहनाने त्याने पुन्हा डान्सकडे लक्ष दिलं. अठराव्या वर्षी डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत त्याने स्वतःचा क्लास सुरू केला आणि २४व्या वर्षी मराठी चित्रपट व स्टेज शोसाठी कोरिओग्राफर म्हणून नाव मिळवलं. यशाच्या शिखरावर असतानाच २०१७ मध्ये वैयक्तिक आयुष्यात दुःखद ब्रेकअप आणि एव्हेस्क्युलर नेक्रोसिस (AVN) या गंभीर आजाराने त्याला घेरलं. डॉक्टरांनी डान्स थांबवण्याचा सल्ला दिला, पण आई व भावाच्या आधारावर त्याने आत्महत्येचे विचार दूर सारले. 2020 मध्ये कोविड काळात त्याने AVN वरील अनुभव YouTube वर शेअर करण्यास सुरुवात केली आणि अनेकांना प्रेरणा दिली. आजही तो पुन्हा एकदा इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करत आहे. राहुलसारख्या जिद्दी कलाकारांमुळेच आपल्याला कळतं की, स्वप्नं पाळणं म्हणजेच खरं जीवन.
#Inspiration #RahulKamble #NeverGiveUp #DanceJourney #RSK #AVNSurvivor #DreamBig #PassionToProfession #RealLifeHero #ComebackStory #Motivation #MumbaiMitraMag #NewsPaper








