चिंब बरसल्या अमृतधारा गंध मातीचा आला ग… हिरवाईचा साज लेऊनी श्रावण सखया आला ग… घृ
निर्झर वाहाते खळखळून सरिता डोंगरमाथी हिरवा साज चढे अवनी नटली नवरीवानी… वाजती अंबरी सनई चौघडे.. कलिका उमलून खुदकन हसते लाज गाली आली ग…… हिरवाईचा साज लेऊनी… श्रावण सखया आला ग… धृ १
श्रावणसोहळा रंगला भूक्री लेकी सुना आल्या माहेरी हचला जागवू मंगळागौरी प्रेमाने फुंकूया घागरी… इंद्रधनुषी रंग लेऊनी सप्तरंगात रंगूनी आला ग… घृ… २
येता नागपंचमीचा सण माहेरवाशिन झोका झूलते रक्षाबंधन बांधून हाती भाऊबहीणीचे प्रेम फुलते… गौरीहराला आळवूनी त्या
गौराईस घरी आणा ग…. घू हिरवाईचा साज लेऊनी….. ३
श्रावणसखया मैत्र जीवाचा ऽऽपोशिंदाऽऽत्या बळीराजाचा उत्सव सजे व्रतवैकल्याचा ऋतू धरती अंबर मिलनाचा दान मागूनी सौभाग्याचे उमापार्वतीस पूजूया ग हिरवाईचा साज लेऊनी श्रावण सखया आला ग
चिंब बरसल्या अमृतधारा गंध मातीचा आला ग हिरवाईचा साज लेऊनी सखया श्रावण आला ग… घृ
– पल्लवी उमरे मुंबई






