प्रीति झिंटाच्या वयाबाबत बोलायचं तर, ती सध्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. पण, तरीसुद्धा एखाद्याला पंचवीशीच्या तरुणीला लाजवणारं तिचं सौंदर्य आहे. पंजाबच्या संघाच्या मालकीणीच्या ब्युटी सीक्रेट्सबाबत तुम्हाला माहितीय का? प्रीति झिंटाच्या चमकदार आणि चिरतरुण त्वचेचं रहस्य तिचं नियमित स्किनकेयर रुटीन आहे. प्रीति सीटीएम म्हणजेच, क्लींजिंग, टोनिंग, मॉयस्चराइजिंग रूटीनचं काटेकोरपणे पालन करते. ही ट्रिपल स्टेज प्रोसेस तिची स्किन नितळ, हायड्रेटेड आणि कोमल ठेवते. प्रीति माइल्ड फेशियल क्लींजरचा वापर करते. ज्यामुळे तिच्या स्किनवरचे अस्वच्छ पार्टिकल्स दूर होतात. ती दिवसातून दोनदा चेहरा धुते. तर, रात्री मेकअप हटवून झोपते. त्यामुळे त्वचेला फ्रेश एअर मिळते. टोनर त्वचेचे पोर्स बंद करतं आणि स्किन टवटवीत ठेवतं. प्रीति झिंटा नॅचरल टोनरचा वापर करते, जे स्किनला एक्स्ट्रा हायड्रेशन देतं. याव्यतिरिक्त ती नाईट क्रीम लावते, ज्यामुळे त्वचेतील कोलेजन प्रोडक्शन वाढतं. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. प्रीति झिंटा नॅच्युरल आणि लाईट मेकअपला प्रायॉरिटी देते. ती न्यूट्रल लिप शेड्स, हल्का ब्लश आणि कोहल-लायनरचा वापर करते, त्यामुळे नॅच्युरल ब्युटी वाढवण्यास मदत होते. प्रितीचं डाएट तिचं सौंदर्य आणि फिटनेसचा एक प्रमुख हिस्सा आहे. ती दिवसातून 6-7 वेळा छोटे मील्स घेते, ज्यामुळे तिचं मेटाबॉलिज्म वाढतं आणि तिचं वजन नियंत्रित राहतं.







