📰 MUMBAI MITRA NEWS
——
● मीरा भाईंदर महापालिकेच्या लता मंगेशकर ऑडिटोरियम नाटकघरात एक कार्यक्रमाचे आयोजन
● समाजसेवी आणि धड़क कामगार यूनियन महासंघ अध्यक्ष अभिजीत राणे चे सल्लागार गणपत कोठारी यांची विशेष उपस्थिती
——
मीरा भाईंदर : ‘We for Humanity’
या समर्पित समाजसेवा संस्थेने समाजातील दुर्बळ घटकांना आधार देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. या कार्यक्रमात समाजसेवी आणि उद्योगपती गणपत कोठारी यांच्या विशेष उपस्थिती होती. याच उदात्त हेतूने संस्थेने लता दीदी की आवाज, एक सहस्रकालाला आदरांजली या एका भव्य चॅरिटी शोचे आयोजन केले होते. भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुमधुर आठवणींना उजाळा देत, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे
अध्यक्ष श्री. निलेश पोळ यांच्या नेतृत्वाखाली ‘We for Humanity’ गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना नियमितपणे मदत
करते. या कार्यक्रमादरम्यान श्री. पोळ यांनी मान्यवर अॅड. रोहण वंदना उत्तम कोरडे यांचा सत्कार केला, ज्यामुळे संस्थेच्या कार्याला आणखी बळ मिळाले. हा चॅरिटी शो केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्ह-ता, तर तो गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचा एक भाग होता. “We for Humanity’ च्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक गरीब कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळणार आहे. संस्थेचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे आणि समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे.
#WeforHumanity #LataMangeshkarAuditorium #CulturalNightMBMC #लता_मंगेशकर_नाटकगृह #AbhijeetRane #GanpatKothari







