📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
● वसईत वाढते आरएमसी कारखाने चिंताजनक!
● मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि निवासी भागांमध्ये आरएमसी कारखाने
● वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ
● धूळ आणि प्रदूषणामुळे वसईकर त्रस्त
——
विशेष प्रतिनिधी, मुंबई
एकीकडे नियमांचे उल्लंघन करून तयार होत असलेले सिमेंटचे कारखाने तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामाच्या पडत असलेला विळखा यामुळे निसर्गाने नटलेल्या वसईची हिरवाई कमी होऊन विद्रूपीकरण वाढत आहे. येथील वाढती लोकसंख्या धूळ आणि प्रदूषण यामुळे वसईकर जनता त्रस्त झाली असून सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनातील गरजांसाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे.
एकेकाळी वसई म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचे लेणे समजले जायचे. वसईच्या पश्चिमे कडे विशाल सागरी तर पूर्वेकडे हिरवाईने नटलेली पर्वतरांग! त्यामुळे अनेक पर्यटक वसई कडे आकर्षित व्हायचे मात्र जसजसे शहरीकरण वाढू लागले तसतसा वसईच्या निसर्गाचा ही ऱ्हास होऊ लागला. गेल्या काही वर्षात वसईतील काही भागांचा वेगाने विकास झाला तर काही ठिकाणी जबरदस्ती विकास केला गेला. या विकासाच्या नावाखाली वसईच्या पर्यावरणाचे नुकसान झाल्याचेच दिसून येते.
सध्या तरी वसई हे समस्यांचे आगर असलेल्यांचे चित्र उभे राहते. शहरातील एक समस्या संपण्यापूर्वीच दुसरी समस्या उभी ठाकते. वसईत अनेक ठिकाणी रेडी मिक्स सिमेंट काँक्रीटचे (आर. एम. सी.) कारखाने येथील प्रदूषणात वाढ करत आहेत. या कारखान्यांच्या स्थापनेवेळी सर्व नियम पायदळी तुडवले जातात. यापूर्वी वसईत एखाद-दुसरा सिमेंट कारखाना असायचा. आता ही संख्या वाढून सुमारे चाळीस झाली आहे. यातील बहुतांश कारखाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आणि निवासी भागांमध्ये आहेत.
सिमेंटच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुळीचे प्रमाण लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हे कारखाने नागरी वस्त्यांपासून दूर, मुख्य रस्त्यांपासून पाचशे मीटरची सीमा, कारखान्यानभोवती कंपाउंड असे अनेक नियम घालून दिले आहेत. परंतु ही नियमावली पायदळी तुडवली जाते. शिवाय हे कारखाने दिवस-रात्र सुरू असल्याने नागरिकांना शांतपणे झोप घेता येत नाही. सिमेंटच्या कारखान्यातील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. श्वसनाचे विकार बळवत आहेत.
या कारखान्यांमुळे आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डा सारख्या सरकारी यंत्रणाच्या उदासीनतेमुळे प्रदूषण कर्त्यांचे मनोबल वाढले आहे. या प्रदूषणामुळे केवळ मानवी जीवनच नव्हे, तर नैसर्गिक सौंदर्यालाही बाधा पोहोचत आहे. कारखान्यातून निघणारे धूळ अनेक झाडांवर जमा होत आहे. भात शेतीची अवस्था बिकट झाली आहे. एकेकाळी वसईची केळी आणि भाजी मुंबईत प्रचंड मागणी असायची मात्र त्यांचीही आता दुरावस्था झाली आहे. एकेकाळी फळांनी बहरलेल्या झाडांना फळच येत नाहीत. झाडांच्या मुळांवर जमलेल्या सिमेंटच्या थरांमुळे झाडांची मुळेच नष्ट होऊ लागली आहेत. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मूलभूत समस्यांवर ताण पडत आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी येथील नागरिकांना
मोठा संघर्ष करावा लागत आहे. येथील वाढती अनधिकृत बांधकामे हा देखील गंभीर विषय बनलेला आहे. या अनधिकृत बांधकामांसाठी कांदळवनचा ऱ्हास केला जात आहे. वसई-विरार शहर महापालिकेचा कारभार म्हणणे ऐकूनच आनंद आहे. 55 अनधिकृत इमारतींचे प्रकरण बाहेर गाजले. वसईच्या समुद्रकिनारी सुमारे 15 हेक्टर कांदळवणाच्या जमिनीवर पालिकेने इमारतींसाठी परवानगी दिल्याचे कळते.
प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांना हरताळ
सिमेंटच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुळीचे प्रमाण लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हे कारखाने नागरी वस्त्यांपासून दूर, मुख्य रस्त्यांपासून पाचशे मीटरची सीमा, कारखान्यानभोवती कंपाउंड असे अनेक नियम घालून दिले आहेत. परंतु ही नियमावली पायदळी तुडवली जाते. शिवाय हे कारखाने दिवस-रात्र सुरू असल्याने नागरिकांना शांतपणे झोप घेता येत नाही. सिमेंटच्या कारखान्यातील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. श्वसनाचे विकार बळवत आहेत.








