📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
-——
● रिक्षा, टॅक्सींची भाडेवाढ होणार
● धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन’च्या प्रयत्नांना यश
—–
रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ अपरिहार्य
इंधनाच्या दरात होणारी वाढ आणि ॲपवरून होणाऱ्या रिक्षा-टॅक्सीच्या बुकिंगमुळे सर्वसामान्य रिक्षा आणि टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ व्हावी, असा प्रस्ताव ’धडक ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक मालक युनियन’ने परिवहन विभागाकडे दिला होता. गेले वर्षभर याचा पाठपुरावाही केला जात होता. ही भाडेवाढ अपरिहार्य असून ती झाल्यास रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा मिळेल.
-अभिजीत राणे
संस्थापक महासचिव, धडक ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक मालक युनियन
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन’च्या प्रयत्नांना यश मिळत असून लवकरच रिक्षाच्या भाड्यात 3 रुपये तर टॅक्सीच्या भाड्यात 4 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. इंधन आणि सीएनजीच्या दरात वाढ होत असून ॲप आधारित रिक्षा आणि टॅक्सी कंपन्यांमुळेही रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे कारण आणि खाटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला
समोर करत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव ‘धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन’ने परिवहन विभागाकडे दिला असून त्यावर येत्या आठवड्याभरात निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण लवकरच रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये 3 रुपयांची वाढ होऊ शकते. भाडेवाढीचा प्रस्ताव ‘धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन’ने परिवहन विभागाकडे दिला होता. त्यावर परिवहन विभागाकडून विचार केला जात आहे.
ऑक्टोबर 2022 पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. पण इंधन आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. तसंच ॲप आधारित रिक्षा आणि टॅक्सी कंपन्यांमुळेही फटका सहन करावा लगात आहे, अशी भूमिका ‘धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन’ने घेतली होती. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ केली जावी. त्यानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात 3 रुपये आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात 4 रुपयांची वाढ करावी असा प्रस्ताव परिवहन विभागासमोर ठेवण्यात आला होता. अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नसला तरी या आठवड्यात त्यावर निर्णय होऊ शकतो.
रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ झाल्यास रिक्षाचे किमान भाडं हे 23 रुपयांवरुन 26 रुपये इतकं होईल. तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरुन 31 रुपये इतकं होईल.
किती होणार दरवाढ
यापूर्वी 2022 मध्ये रिक्षा दरवाढ झाली होती. त्यावेळी रिक्षाचा दर 21 होते त्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे 23 रुपये रिक्षांचे भाडे करण्यात आले होते. तर टॅक्सीचा दर 25 रुपयांवरून तीन रुपयांनी वाढून 28 रुपये करण्यात आला होता. त्यामुळे आता यावर्षी 4 रुपये दरवाढ संघटनांनी प्रस्तावित केली आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे हे 23 वरून 27 होणार आहे. किलोमीटरसाठी मुंबईकरांना 28 तर टॅक्सीसाठी 32 रुपये मोजावे लागणार आहे. खटुआ समितीच्या शिफारसीनुसार दरवर्षी रिक्षा-टॅक्सी भाडे दर ठरवणे, व त्यात बदल करण अपेक्षित आहे.