📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ गोरेगाव, मालाड , कांदिवली, बोरिवली येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
◆ पश्चिम उपनगरात हवेची गुणवत्ता ढासळली
◆ वाढत्या खोदकामामुळे धुळीचे कण हवेत
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची पातळीत कमालीची घसरण होऊ लागली आहे गेल्या काही दिवसात मुंबई आणि उपनगरात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे बोरिवली कांदिवली मालाड गोरेगाव या विभागातील सर्वाधिक हवेचे प्रदूषण होत आहे यामुळेच दिवसा अकरा बारा वाजताही पूर्ण परिसर धुक्याने झाकलेला आहे. या भागातील हवेत धुळीचे बारीक कण असल्याने त्यांचा सर्वाधिक परिणाम वृद्ध नागरिक ,लहान मुले ,महिलांवर आणि रुग्णांवर होऊ लागला आहे या विभागात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
गोरेगाव, मालाड, कांदिवली या विभागातील हवेची गुणवत्ता कमी होण्यामागचे अनेक कारणे आहेत. यात प्रामुख्याने म्हणजे औद्योगिककरण वाहनाचे प्रदूषण असंख्य नवीन इमारतीचे बांधकामे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामे सुरू असल्याने आणि त्याबरोबर वाहनातून उत्सर्जित होणारे कणही वातावरणात जमा होत असून हवेत तरंगत असतात या विभागात मोठ्या प्रमाणात अनेक नवीन बिल्डिंग बांधल्या जात आहेत कांदिवली या ठिकाणी गोदरेज बिल्डरचे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे यामुळे शेकडो गाड्या मातीने भरून वाहत असल्याने रस्त्यावर माती पडत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे कण हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होत आहे. मालाड आणि गोरेगाव येथेही बऱ्याच ठिकाणी इमारतीच्या निर्मितीचे काम सुरू असल्याने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेताना दिसून येत नसल्याने धुळीचे कण हवेत मिसळून प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे पालिका विभागाकडून कामाची वेळ ठरवून दिली असली तरी या विभागात दिवस रात्र मातीचे ट्रक वाहत असल्याने या ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे.