📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE INTERVIEW
-——
● मराठी माणसाने एकत्र येऊन उद्योग क्षेत्रात स्थान निर्माण करावे: राजीव पाटील
====
● 3 लाख 33 हजार रुपये दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्र देशातील सात सर्वात समृद्ध राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तीन लाख सात हजार 700 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे राज्य समुद्राने वेढलेले आहे. या राज्यात संपूर्ण भारतातील नागरिकांसह जगातील विविध देशांचे नागरिक राहतात. महाराष्ट्राने केंद्रीय अर्थसंकल्पात 14 टक्के योगदान देऊन देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळवला आहे. हे सर्व काही होत आहे ते महाराष्ट्रातील उद्योजकांमुळे… असेच एक महाराष्ट्रातील प्रसिध्द उद्योजक म्हणजे मुळचे पालघर जिल्ह्यातील वसई-विरार येथील राजीव पाटील! वसई-विरार महापालिकेचे प्रथम महापौर होण्याचा बहुमान त्यांना वसई-विरारकरांनी दिला. राज्यात असलेल्या भाजपा महायुतीच्या सरकारने त्यांच्या ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या महायुतीच्या घोष वाक्याला नक्कीच न्याय दिला असल्याचे राजीव पाटील सांगतात. राजीव पाटील यांनी ‘दै. मुंबई मित्र’च्या कार्यालयास भेट दिली असता, ‘दै. मुंबई मित्र’ने त्यांच्या सोबत गप्पा केल्या असता महाराष्ट्रातील प्रत्येक नव उद्योजकाला प्रेरणा देणारी त्यांची मुलाखत!
● राजीव पाटील यांनी आताच्या सरकारवर आपले मत मांडताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात अधिक कार्यक्षमतेने काम करत आहे. राज्याच्या प्रश्नांची अचूक जाण आणि जलद निर्णय हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचा अधिक विकास व्हायचा असेल तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व असणे आवश्यक असल्याचे आज दिसते आहे असे यावेळी ते म्हणाले.
● महाराष्ट्राचा हा गतिमान आर्थिक विकास अधिक समृद्ध करण्यासाठी आणि पहिल्या राज्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम राजकीय वातावरण आणि प्रशासकीय यंत्रणा हवी. ती क्षमता आणि दृष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. फडणवीस सरकारने गेल्या काही महिन्यांमधील आपल्या निर्णयांमधून आणि कार्यपद्धतीतून महाराष्ट्रात आतापर्यंत स्थापन झालेल्या सरकारांपैकी युतीचे सरकार हे सर्वोत्कृष्ट आणि जलद निर्णय घेणारे सरकार असल्याचे सिद्ध केले आहे.
● नव उद्योजकांना संदेश देताना ते सांगतात सर्व काही चायनामध्ये होते असे नाही, आपल्याकडे ही होऊ शकते. चायनाकडे 140 करोड असेल तर आपल्याकडेही 140 कोटी जनता आहे. ग्राहक आपल्याकडे ही खुप आहे. ग्राहकाला लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी या आपण चायनाकडून न मागवता आपल्याकडे तयार केल्या गेल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
● प्रत्येक गोष्टीसाठी टेक्नोलॉजी हवीच असे नाही आहे. अनेक व्यवसाय आहेत जे ह्युज प्रॉड्क्शनसाठी ओळखले जातात यासाठी फक्त दोन-तीन जणांनी एकत्र येऊन हे केले पाहिजे. सर्वात प्रथम म्हणजे चांगले काम करण्यासाठी प्रथम चांगला विचार मनात येणे गरजेचे आहे. या विचारातून चार चांगल्या विचारांची माणसे सोबत घेतील पाहिजेत. आज व्यवसायात गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी अधिक आहेत. आजचा मराठी माणूस यात कमी असण्याचे कारण तो सेफ्टी बघतो परंतू, मुंबईचा इतिहास पाहिला असता पुर्वी मुंबईत सर्वाधिक मराठी माणूस व्यवसायात होता. मुंबईचा विकास करणारे पहिले कंत्राटदार मराठीच होते. जुने विटी आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाना शंकरशेट यांनी बनवले. आजचे उदाहरण द्यायचे झाल्यास, दादर येथे जोशी यांची खानावळ होती त्यांचा मुलगा बाहेरगावी शिकायला गेला आज ती अनामिक यांनी घेतली… ते कोण तर गुजराती माणूस! जोशी यांचा मुलगा शिकला अमेरिकेला गेला. आपण गुजराती माणसाचे अनुकरण करण्यास काय हरकत आहे चांगल्याचे अनुकरण करण्यास कोणतीही हरकत नाही. गुजराती, राजस्थानी, पंजाबी, सिंधी ही माणसे झोकून काम करतात एकमेकांना मदत करतात.
तशीच मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? यावर वर्तमापत्राच्यामाध्यमातून विचारमंथन करणे गरजेचे आहे. व्यवसाय वाढवा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारचे अनेक धोरणे आहेत. आपली इकनॉमी जी आज 5 व्या क्रमांकावर आहे ती तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी राज्यात कारखानदारी वाढली पाहिजे. व्यापारी व्हा… कारखानदार बना. छोटे का होईना पण कारखानदार बना! असे यावेळी त्यांनी उद्योगात येणाऱ्या नव्या पिढीला सांगितले.
● 2025 मध्ये प्रत्येकाने निर्णय केला पाहिजे, मी लहान का होईना पण व्यवसाय करणार… प्रत्येकाला कारखानदार होणे शक्य नाही परंतू 4-5 जणांना रोजगार देणारा व्यवसाय प्रत्येकाने केला पाहिजे. आज समाजातील 10 टक्के नागरीकांनी जरी असे ठरवले तरी आपण खुप काही मिळवले असे म्हणू शकतो.
● व्यापार… कारखानदारी होणे आज खुप गरजेचे आहे. परंतू मराठी माणसाचा एक समज झालेला आहे की, व्यापारी म्हणजे चोर! कारखानदार म्हणजे महाचोर! व बिल्डर म्हणजे तर दरोडेखोर…! व्यापार, कारखानदार व बिल्डर म्हणजे चोर नाही… ते चुका करत असतील पण ते काही तरी निर्माण करतात… लोकांच्या हाताला काम देतात… रोजगार देतात. ते जेव्हा एका माणसाला काम देतात तेव्हा त्याला देत असलेल्या पगारातून त्याघराच्या प्राथमिक गरजा पुर्ण होत असतात हे एक प्रकारचे सामाजिक कार्य आहे असे म्हणायला हरकत नाही व या सामाजिक कार्याला प्रोत्साहन नक्कीच मिळाले पाहिजे.
● आताचे शासन खुप चांगले आलेले आहे. आताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरुण आहेत त्यांचे विचारही तरुणांना प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्याकडे तरुणांना दिशा देणारे ‘थिंक टँक’ आहे…. त्यांची काम करण्याची धमक प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या पहिल्या पर्वात त्यांनी मेट्रो सुरु केली दुसरे पर्व त्यांना मिळाले नाही… नाहीतर आज मेट्रोचे जाळे अधिक मोठे झाले असते. परंतू कलकत्त्याला मेट्रो 1980 ला झाली पण मुंबई का नाही झाली? मुंबईत तसा विचार करणारी मंडळी होती नव्हती हे मला माहित नाही पण मुंबईचा विचार करणारी माणसे होती का? असे विचारले असता त्याचे उत्तर नाही असे येते.
● एक आयएएस अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, मुंबईला काय हवे याचा विचार करणाऱ्या माणसांची महाराष्ट्रात वाणवा होती. मुंबईतून मोठ-मोठे राजकारणी झाले परंतू मुंबईचा वेगळ्या दृष्टीने वापर केला. मुंबईची जडण-घडण करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही. ते सांगतात, सुरुवात झाली ती युतीच्या काळात नितिन गडकरी यांच्या पुढाकारामुळे प्रथम सी लिंक झाला, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेट्रोचे जाळे उभे केले, समृध्दी महामार्ग उभा केला. नितिन गडकरी यांच्या कार्यालयात एक म्हण लिहिलेली आहे, ‘अमेरीका श्रीमंत आहे म्हणून त्यांचे रस्ते चांगले नाहीत तर, अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे.’ पायाभूत सुविधा हव्याच ज्या देशाची संवादाची साधने चांगली आहेत त्याच देशाची प्रगती होते.