📰 MUMBAI MITRA EXPOSE
-——
● रेल्वे पोलीस प्र्रशासनाचा बोगस हमालांना छुपा पाठिंबा
● दादर रेल्वे स्थानकावर बोगस हमालांकडून प्रवाशांची लूट
● बिल्ला नसलेल्या बेकायदेशिर हमालांचा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मध्य पूलावर हैदोस
● बोगस हमाल नशा करून उभे राहतात पुलावर
● अनेकवेळा प्र्रवाशांना अडवून सामान घेऊन जाण्यासाठी बळजबरी
● महिला प्रवाशांसोबत हुज्जत घालून मनमानी रक्कम जाते काढली
——-
धडक कामगार युनियन वसई, पनवेल आदी विविध रेल्वे स्थानकांवरील हमालांचे प्रतिनिधीत्व करते. अशाप्रकारामुळे हमालांबाबत प्रवाशांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरसमज तयार होऊ शकतो तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हो मोठा प्रश्न आहे. यावर रेल्वे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.
-अभिजीत राणे
संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन
——-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर रेल्वे स्थानक हे मुंबई शहरातील सर्वात जास्त वर्दळीचे मुख्य असे एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून पुणे, वडोदरा, नाशिककडे जाणाऱ्या बहुतेक गाड्यांच्या प्रमुख रेल्वे थांबा दादर आहे. दादर रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटत असल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची ही गर्दी हजारोंच्या संख्येने असते. या दादर स्थानकावरील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा मध्य पूल असून, दादर प्लॅटफॉर्मला सलग पश्चिम रेल्वे स्थानकापासून तर मध्य स्थानकापर्यंत 1 ते 15 असे नंबर दिलेले असल्याने या पुलावर नेहमीच बाहेरुन आलेल्या प्रवाशांची वर्दळ दिसून येते.
जाणाऱ्या प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी रेल्वेने ठरवून दिलेले बिल्लाधारी अधिकृत हमाल असल्याने प्रवाशांचे सामान रेल्वे डब्यापर्यंत पोहोचवून देणे आणि रेल्वेने ठरवून दिलेला दरात त्यांची मजुरी हमाल घेत असतात. परंतू याच रेल्वे पुलावर आता बिल्ला नसलेले बेकायदेशी हमाल रेल्वेच्या हमालांसारखे कपडे घालून खुलेआम प्रवासाची लूट करत आहेत. या बेकायदेशीर हमालांना रेल्वे पोलीसांचा छुपा पाठिंबा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
धडक कामगार युनियनने याबाबतीत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यावेळी बोलताना, धडक कामगार युनियन वसई, पनवेल आदी विविध रेल्वे स्थानकांवरील हमालांचे प्रतिनिधीत्व करते. अशाप्रकारामुळे हमालांबाबत प्रवाशांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरसमज तयार होऊ शकतो तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हो मोठा प्रश्न आहे. यावर रेल्वे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
हे बोगस हमाल नशा करून पुलावर उभे राहतात आणि गावी जाणाऱ्या लोकांना मध्येच अडवून सामान घेऊन जाण्याचे सांगून बळजबरीने त्यांचे सामान खेचत असतात ओढत असतात, नको काही गरज नाही म्हणणाऱ्या प्रवाशांवर भडकतात. यांना प्रत्येक गाडीची वेळ माहित असल्याने ज्या वेळेत जाणाऱ्या गाड्यांची नावे घेऊन तुमची गाडी सुटणार आहे. वेळ खूप कमी आहे. मी तुम्हाला घेऊन जातो. असे सांगतात काही महिला प्रवासी मान्य करून सामान घेण्यासाठी तयार होतात तर मग हे हमाल मनमानी रक्कम सांगतात तुम्हाला उशीर झाला आहे रेल्वे स्थानक लांब आहे तुम्ही पोहोचू शकणार नाही असे बोलून प्रवाशांना घाबरवतात आणि प्रवाशांनकडून जास्त पैसे घेतात.
काही प्रवासी गाडी कोणत्या क्रमांक प्लॅटफॉर्मवर येईल फक्त एवढे विचारल्यास त्यांना चुकीचा प्लॅटफॉर्म सांगून प्रवाशांची दिशाभूल करतात यांच्याकडे रेल्वेने दिलेला गणवेशही नसतो आणि बिल्ला क्रमांकही नही हे पुलावर मध्येच नशा करून फिरत असतात. येणाऱ्या प्रवाशांना नहाक त्रास देत असतात कधी शिवीगाळही करत असतात रेल्वे स्थानकावर अनेकवेळा गोंधळ घालत असतात. त्यामुळे आता या बेकायदेशिर हमालांवर तात्काळ कारवाईची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
