📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
-——
◆ विधानसभा निवडणूकीच्या अनुशंगाने करण्यात आली होती बदली
◆ १५५ पोलीस निरिक्षकांची पुन्हा मुंबईत बदली!
◆ पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ३०, गुन्हे अन्वेषण विभातील २६ तर नागरी संरक्षण विभागातून मुंबईत बदली झालेल्या ४ पोलीस निरिक्षकांची करण्यात आली बदली
———
विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईच्या बाहेर बदली होऊन गेलेले 161 पोलीस निरीक्षकांपैकी 155 पोलीस निरीक्षकांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईत पुन्हा बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये मुंबईत बदली होऊन आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर बदली झालेले 155 पोलीस निरीक्षक मुंबईत परतले आहे. राज्य पोलीस दलातील अस्थापनाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोबरला राज्यातील एकूण 333 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्वाधिक 161 अधिकाऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबईतुन गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे या अधिकारी नाराज झाले होते. यातील काही अधिकाऱ्यांनी मॅट आणि काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या पुन्हा परतल्या नंतर मुंबईबाहेर बदली झालेले अधिकारी पुन्हा मुंबईत परतण्याची आस लावून बसले होते. अखेर, राज्य पोलीस मुख्यालयाने बुधवारी 215 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.
राज्यात विविध ठिकाणी बदली देण्यात आलेल्या 155 पोलीस निरिक्षक यांना मुंबईत बदली देण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रामधून मुंबईत बदली करण्यात आलेल्या 30 पोलीस निरिक्षकांना पुन्हा प्रशिक्षण केंद्रात बदली देण्यात आली आहे. याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागातून मुंबईत बदली झालेल्या 26 पोलीस निरिक्षकांची पुन्हा गुन्हे अन्वेषण विभागात बदली देण्यात आली आहे. तसेच नागरी हक्क संरक्षण विभागातून मुंबईत बदली झालेल्या 4 पोलीस निरिक्षकांना पुन्हा नागरी हक्क संरक्षण विभागात बदली देण्यात आली आहे.