📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
-——
◆ शपथविधी सोहळ्यात मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
◆ कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष खबरदारी; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त
———
विशेष प्रतिनिधी, मुंबई
पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला प्रारंभ झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये मुख्य भुमिका बजावली ती म्हणजे मुंबई पोलीसांनी… केंद्रीय मंत्री व अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व देशाभरातून मान्यवर मुंबईत आले असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नया यासाठी स्वतः मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत बंदोबस्त करण्यात आला होता.राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार असल्याने मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे पाच हजारपेक्षा जास्त पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे दक्षिण मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांबरोबर एसआरपीएफ, जलद कृतीदल, दंगलनियंत्रण पथकाची कुमक तैनात करण्यात आल्या होत्या, वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांतर्फे नियमन करण्यात आले होते. पार्किंगसाठी जागा नसल्याने शपथविधीसाठी येणाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. यशस्वीरित्या सोहळा पारपडल्याने मुंबई पोलीसांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली होती. सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्याकरिता कार्यक्रमादरम्यान पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 उपायुक्त, 29 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 520 अधिकारी आणि साडेतीन हजार कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. त्याबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी ‘एसआरपीएफ’च्या प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगलनियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बॉम्बशोधक व नाशक पथक यांची नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण मुंबईच्या सर्व रस्त्यांवर बुधवारपासूनच पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
कोणताही गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी शपथविधी सोहळयासाठी ठिकाणी येणाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत होते. आझाद मैदान तसेच आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस विभागातील अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त, 30 अधिकारी आणि 250 कर्मचारी वाहतूक नियमनासाठी तैनात करण्यात आले होते.