📰 MUMBAI MITRA EXPOSE
-——
◆ महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडून प्रकरणाची दखल
◆ पालिकेकडून बोरीवलीचा रस्ता फेरीवाल्यांना आंदण
◆ बेस्टवर बस मार्ग वळवण्याची वेळ
◆ बेस्ट आणि वाहतूक पोलिसांनी पालिकेला पाठवलेल्या पत्रांवर शुन्य कारवाई
◆ 2013 पासून बोरिवलीत फेरीवाल्यांकडून संपुर्ण रस्त्यावर अतिक्रमण
◆ आर/मध्य विभाग व वाहतूक पोलीस फेरीवाल्यांच्या ताटाखालचे मांजर
———
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिका व पालिकेचा आर/मध्य विभाग व वाहतूक पोलीस फेरीवाल्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्याचे भयावह चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. गंभीरबाब म्हणजे वाहतूक पोलीस आणि बेस्टच्या पत्रांकडे दुर्लक्ष करून पालिकेने बोरिवलीतील
फेरीवाल्यांना रस्त्यांवर इतक्या प्रमाणात अतिक्रमण करण्याची परवानगी दिली आहे की, बस मार्ग वळवण्याची वेळ बेस्टवर आलेली आहे. 2013 पासून बोरिवलीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर पूर्णपणे अतिक्रमण करून बेस्टचे मार्ग कमी केले आहेत, असल्याचे बेस्टने आपल्या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने (एमएसएचआरसी) या प्रकरणाची स्वतःहून याप्रकणाची दखल घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के.के.ताटेड आणि पॅनेलचे सदस्य एम ए सईद यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने पालिका आयुक्तांना बोलावले आहे आणि निष्पक्ष तथ्य शोध अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बेस्ट आणि वाहतूक पोलिसांनी पाठवलेल्या पत्रांवर कारवाई का केली गेली नाही किंवा उत्तरे का दिली गेली नाहीत हे या अहवालात मांडण्यात आले आहे. बेस्टचे मार्ग वळवणे हा मुंबई महापालिका व वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेचा थेट परिणाम आहे, असे न्यायमूर्ती के के ताटेड यांनी नमूद केले आहे. आयोगाने पालिका आयुक्तांना बेस्ट आणि वाहतूक पोलिसांच्या पत्रांवर कारवाई आणि प्रतिसाद न दिल्याबद्दलचा स्पष्टीकरण देणारा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीत बेस्ट, पोलीस आयुक्त (मुंबई) आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) यांना समन्स पाठवण्यात आले होते.
खंडपीठाने यावेळी मत मांडताना, या गंभीर चुकांमुळे नागरीकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली आहे, त्यांना रस्त्यांपासून वंचित ठेवले आहे आणि बेस्टला त्यांचे मार्ग बदलण्यास भाग पाडले आहे. अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई पोलीस आयुक्त व वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून या समस्येचे निराकरण करण्याचे आणि पुढील सुनावणीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपिटाने यावेळी दिले आहेत.
मुंबई महापालिकेकडून बेस्टच्या पत्राला केराची टोपली
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात बेस्टने म्हटले आहे की, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भाजी मार्केट गल्ली ते चंदावरकर रोड मार्गे वळवाव्या लागल्या, त्यामुळे गाडी चालवणे अशक्य झाले त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी तयार झाली.
वाहतूक विभागाची 3 वर्षांपासून पालिकेला पत्र
बोरिवली वाहतूक विभागाने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून पालिकेला पत्र लिहून अतिक्रमण हटवण्याची विनंती केली जात आहे परंतू, महापालिकेने त्याला प्रतिसाद दिला नाही किंवा कारवाई सुध्दा केली नाही.
काय घडले सुनावणीत?
सुनावणीदरम्यान, बेस्टकडून सांगण्यात आले की,‘या रस्त्यावरील बेस्टचे मार्ग 11 नोव्हेंबर 2013 रोजी फेरीवाल्यांमुळे वळवण्यात आले होते. तेव्हापासून, आम्ही पालिकेला रस्ता
मोकळा करण्यासाठी वारंवार पत्र लिहिले आहे जेणेकरून सेवा पुन्हा सुरू होईल.