📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
-——
◆ मुंबईत गुटखा तस्करी पुन्हा सक्रिय!
◆ ‘दै. मुंबई मित्र’ मुंबई व उपनगरांत नव्याने तयार झालेल्या संपुर्ण रॅकेटचा करणार पर्दाफाश
———
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गुटखा बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला 11 वर्षे उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रातील गुटख्याचा हैदोस काही थांबलेला नाही हे अपयश कोणाचे असा सवाल आता नागरीक विचारत आहेत. 2022 ते 2023 दरम्यान ‘दै.मुंबई मित्र’ ने गुटखा नावाच्या या घातक अजगराच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी ‘ऑपरेशन गुटखा’ ही मोहीम सुरू केली होती त्यानंतर मोठ्याप्रमाणात मुंबई व उपनगरे व संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात कारवाई सुरु झाली होती. मुंबईतील मीरा रोडमध्ये तर गुटखा तस्करीवरुन गोळी झाडण्याच्या घटनाही घडल्या होत्या. या
मोहिमेअंतर्गत विविध गुटख्याच्या उत्पादक कंपन्या, सप्लायर, डीलर यांची माहिती ‘दै.मुंबई मित्र’ ने प्रसिध्द केली होती. परंतू आता पुन्हा ‘गुटखा’ रुपी अजगराने मुंबई व उपनगरांत आपली पाळमुळे पसरायला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीसांकडून गुटख्यासंदर्भात गुन्हा अन्वेषण विभागात बैठकी होत असून पुन्हा कारवाई होणार असली तरी, मुंबई पोलीसांनी पुन्हा गुटखा संदर्भातील कारवाई पुर्वीप्रमाणे अधिक कठोर करण्याची गरज आहे. ‘दै. मुंबई मित्र’ सुत्रांच्या माध्यमातून मुंबई व उपनगरांत नव्याने तयार झालेल्या संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार आहे, उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात पानमसाला व गुटखा बंदी संदर्भात कठोर शब्दात आदेश दिले असले तरी महाराष्ट्र पोलीसांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रात गुटखा विकला जातो, घेतला जातो… त्यामुळे राज्य सरकारची गुटखा बंदी फक्त कागदावरच आहे.
गुटखा तस्कर मात्र महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी नवनव्या क्लुप्त्या तयार करीत असून यावर मुंबई पोलीस, ठाणे ग्रामिण पोलीस, ठाणे शहर पोलीस, पालघर पोलीस व वसई-विरार मिरा भाईंदर पोलीस काय कारवाई करतात व मुंबई आणि उपनगरांत दिवसाढवळ्या विकला जाणाऱ्या गुटख्यावर कशा प्रकारे निर्बंध घालतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.