📰 MUMBAI MITRA FOLLOW UP
——-
◆ बंबल डेटींग ॲपवरून भेटलेल्या तरुणीने एक तासात केले ३९ हजारांचे बिल
◆ मुंबईनंतर ठाण्यात डेटिंग स्कॅम
◆ संजना नावाने बंबल डेटींग ॲपवर अकाऊंट
◆ चितळसर मानपाडा पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा तरुणाचा आरोप
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत डेटिंग ॲप स्कॅम उघडकीस आल्यानंतर आता असाचप्रकार ठाण्यातील क्लबमध्ये होत झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतीत मागील महिन्यात 39,000 रुपयांची फसवणूक झाल्याच्या 25 वर्षीय तरुणाच्या ठाणे पोलिसांतील ऑनलाइन तक्रारी नंतर हा धक्कादायकप्रकार अद्यापही सुरु असल्याचे समजले आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल न केल्याने तरुणाने ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. याउलट पोलीसांकडून याप्रकरणाचा अधिक पाठपुरावा करु नका असे फसवणूक झालेल्या तरुणाला सांगितले गेल्याचा प्रकार घडला आहे. ‘दै. मुंबई मित्र’ने अशाच प्रकारचा मुंबईत फसवणूक झालेला प्रकार उघडकीस आणला होता. ज्यामध्ये टिंडर ॲपवरून ‘मनिषा 25’ प्रोफाईलवरून चॅटकरुन गॉडफादर या डिस्कोमध्ये बोलवून तब्बल 55 हजार रुपयांचे बिल केले होते. याबाबतीत अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंबल डेंटीग ॲपवरुन तरुणाला डेटिंग प्लॅटफॉर्मवर भेटलेल्या तरुणीने ठाण्यातील ‘ग्लिट द सुपर क्लब’ जाण्याची मागणी केली तेथे तिने खाण्यापिण्याची ऑर्डर व एक तासात तब्बल 40 हजारांचे बिले केल्याचा दावा तरुणाने केला व बिलाची रक्कम जबरदस्ती भरण्यास भाग पाडले. याबाबतीत पोलीसांनी तरुणास असहकार्य दाखवत आणि गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, त्यांच्यापैकी एकाने त्याला या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करू नका असे सांगितले.
24 ऑक्टोबर रोजी बंबल डेटिंग ॲपवर संजना नावाच्या तरुणीशी तरुणाची मैत्री झाली. चॅटिंग सुरू झाले आणि नंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. तरुणाने तिला ठाण्यातील मानपाडा परिसरातील ‘गौरव स्वीट्स’ जवळ भेटण्यास सांगितले. त्यानंतर 25 ऑक्टोबरला तरुणी तरुणास ग्लिट क्लबमध्ये घेऊन गेली. तरुणीने ऑर्डर करण्यास सुरुवात केली. एक तास ते तिथे बसले असता जेव्हा बिल आले तेव्हा जवळपास 40,000 रुपये आकारले गेलेले पाहून तरुणाला धक्का बसला. त्यावर त्याने आक्षेप घेतला तेव्हा बाऊन्सर आणि क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर दबाव आणला. तेव्हा क्रेडिट कार्डने तरुणाने बिल भरले हा सर्व प्रकार सुरु असताना, ती तरुणी तेथे शांतपणे उभी होती. ते क्लबमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गाडी जात असताना तरुणीला अचानक वडिलांचा फोन आला आणि तरुणास निघून जावे असे सांगून तरुणी कारमधून खाली उतरली.त्यानंतर तरुणाने संपर्क साधला असता फोन बंद झाल्याचे समजले यानंतर तरुणाची फडवणूक झाले असल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
तरुणाने पोलीस हेल्पलाईन नंबरवर कॉल करून त्यांना या घोटाळ्याची माहिती दिली त्यानंतर तीन पोलीस कर्मचारी तेथे आले आणि ते क्लबच्या व्यवस्थापकाशी बोलले. त्यानंतर एका पोलिसाच्या दुचाकीवरून त्या व्यक्तीला चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तरुणाने गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली परंतू, चितळसर मानपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामध्ये एका अधिकाऱ्याने तरुणास सांगितले की, क्लब कथितपणे एका राजकारण्याच्या मालकीचा आहे त्यामुळे प्रकरण वाढवू नये असे सांगितले. 2 तास विनंती करूनही पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही.अशी सुत्रांची माहिती आहे.
तरुणाने ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तीन दिवसांनंतर तरुणास फोन आला आणि सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि व गुन्हा नोंदवणे आवश्यक असेल तर तो दाखल केला जाईल असे सांगण्यात आले आहे. परंतू अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असे समजते.
====
◆ ‘मीना डिफॉल्टर’ला करण्यात आली होती अटक
डेटींग ॲप स्कॅम प्रकरणात अंकुर मीना, उर्फ हॅप्पी, ज्याला ‘मीना डिफॉल्टर’ याला नुकतेच बांगुरनगर पोलीसांनी
अटक केली होती, ज्यामध्ये अनेक खुलासे अंकुर मिना कडून तपासात उघड झाले आहेत. 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या मीनाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अंबोली पोलिसांनी त्याला गॉडफादर क्लबशी संबंधित गुन्ह्यातील गुन्ह्यात ताब्यात घेतले होते.