📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ ओशिवारा मेट्रो ब्रिजच्याखालील रस्ता भुमाफियांकडून गिळंकृत
◆ के पश्चिम प्रभाग व ओशिवारा पोलीस ठाण्याकडून कारवाईची मागणी
◆ बेकायदेशीरपणे थेट रस्त्यावरच टाकले जाते भंगार, राडारोडा व कचरा
◆ सायंकाळी सहानंतर भर रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यातून भंगार वेगळे करण्याची प्रक्रिया सुरु
◆ मुंबई महापालिका व मुंबई पोलीसांच्या नाकावर टिच्चून रस्त्यावर सर्व प्रकार सुरु
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम प्रभाग अंतर्गत येणाऱ्या ओशिवारा येथील हिंदू स्मशान भूमीकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो ब्रिजच्या खाली भुमाफियांकडून मुंबई महापालिका व मुंबई पोलीसांच्या नाकावर टिच्चून बेकायदेशीरपणे थेट रस्त्यावरच भंगार, राडारोडा व कचरा टाकला जात आहे. यावर भुमाफियांची अतिशयोक्ती म्हणजे सायंकाळी सहानंतर याठिकाणी भर रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यातून भंगार वेगळे करण्याचा प्रकार सुरु होतो.
गंभीरबाब म्हणजे हा सर्व प्र्रकार मेट्रो ब्रिजच्या खाली होत असून, या कचऱ्याला अनेकवेळा आग लागली आहे परंतू प्रकरण तात्काळ दाबले जाते. रस्त्यावर बेकायदेशिरपणे भंगाराचा धंदा थाटणाऱ्या भुमियांवर पालिका कारवाई केव्हा करणार? असा सवाल येथील स्थानिक विचारत आहेत.
ओशिवाराकडून हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. भविष्यात येथे आग लागून मोठी दुर्घटना होण्याची भिती स्थानिक नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. यावर आता मुंबई महापालिकेचा के पश्चिम प्रभाग व मुंबई पोलीस अंतर्गत येणारे ओशिवारा पोलीस ठाणे केव्हा कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.