📰 MUMBAI MITRA FOLLOW UP
——-
◆ गृहसंकुलाकडून गोरेगाव पोलीस ठाण्यास तक्रार देऊन वर्ष होऊनही अद्याप कारवाई नाही
◆ ‘वेदांत’ इमारतीकडून 27 डिसेंबर 2023 मध्ये देण्यात आली होती तक्रार
◆ गोरेगावमधील विर लक्ष्मणराव राणे मार्गावर तळिरामांचा ओपन बार!
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गोरेगावमधील उच्चभ्रू अशा उन्नन नगर 2 येथील विर लक्ष्मणराव राणे मार्ग तळीरामांचा अड्डा बनला आहे, अशा आशयाची बातमी प्र्रसिध्द केली होती. याबातमीचे मोठे पडसाद उन्नत नगर 2 मध्ये पडले असून, नागरीकांनी येऊन त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यास दिलेल्या तक्रारी ‘दै. मुंबई मित्र’ला पाठवल्या.
‘दै. मुंबई मित्र’ने दिलेल्या बातमीमध्ये, अनेक मद्यपी सायंकाळपासुन दारू पिण्यासाठी येतात. पाण्याची बाटली, ग्लास विक्रीचे दुकान प्रत्येकच चौकात असल्याने मद्यपी याच ठिकाणी खुलेआम दारू पितात. विर लक्ष्मणराव रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढू लागले आहे दररोज मद्यपींची संख्या येथे वाढत आहे. असा आरोप स्थ केला आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली असून, ‘दी गोरेगाव गणेश कॉ. ऑ. हाऊसिंग सोसायटी लि.’च्या माध्यमातून ‘वेदांत सोसायटी’च्या नागरीकांनी 27 डिसेंबर 2023 मध्ये लेखी तक्रार दिली होती व येथील तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
‘वेदांत सोसायटी’ कडून दिलेल्या पत्रामध्ये, आम्ही सोबत वेदांत रहिवाश्यांच्या स्वाक्षरीनी प्रत जोडत आहोत. आमची इमारत वेदांत, गोरेगाव गणेश को. ऑप. हाऊसिंग सोसायटी नजीक असलेल्या बिमसी सफाई कामगार कार्यालय ते गुंदेचा पाळणाघर येथे दारुडे लोक आणि भिकारी मोठ्या आवाजात गोंधळ घालत असतात. हे दारुडे लोक तर उघड उघड दारू पित असतात तर कधी एखाद्या गाडीत, तर कधी रिक्षात ते मोठ्या आवाजात गाणी लावतात असे आढळून आले आहे.
हा परिसर उन्नत नगर नं 2, तीन डोंगरी, विनायक नगर, अनमोल टॉवर इत्यादी रहिवाश्यांचा येण्याजाण्याचा मार्ग आहे. तेथून जाता येताना रहिवाशांना त्रास होत आहे. आपण आपल्या नियमानुसार या लोकांवर योग्य ती करावाई करावी. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, बालके यांचे जाणे-येणे सुखकारक होईल अशी आम्हा रहिवाश्याची नम्र विनंती आहे. असे पत्र देण्यात आले असतानाही पोलीस प्रशासनाला याचे गांभिर्य नाही. पोलीस येथे भविष्यात काही मोठी घटना घडावी याची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल येथील नागरीकांनी गोरेगाव पोलीसांना विचारला आहे.