📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ देवेंद्र फडणवीस हे असामान्य अलौकिक व्यक्तिमत्व: कामगार नेते अभिजीत राणे
◆ धडक कामगार युनियनचा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
कालचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. महाराष्ट्राचे आशास्थान, श्रध्दास्थान आणि भवितव्य असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची हार्दिक भेट झाली आणि त्यांनी प्रेमाने दिलेली शाबासकीही मिळाली. निमित्त होते धडक कामगार युनियन तर्फे महायुतीला पाठिंबा देणारे पत्रक सुपूर्द करण्याचे. खरोखरच देवेंद्र फडणवीस हे असामान्य अलौकिक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नुसत्या दर्शनाने कार्यकर्त्यांना उर्जा चैतन्य प्रेरणा मिळाते. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझ्या जीवनातील अनेक अविस्मरणीय आठवणी निगडीत आहेत. काल त्यांची भेट झाली आणि रोमांचित हर्षभरित अभिमंत्रित झालो.
-अभिजीत राणे
संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन
=====
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे. मालाड (प.) विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार विनोद शेलार यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहिर सभेत कामगार नेते अभिजीत राणे यांनी पाठिंब्याचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी त्यांनी युनियनला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महायुतीमध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष आणि इतर घटक पक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि जनतेच्या कल्याणाचा अजेंडा पुढे नेत असून, यासाठी त्यांनी महायुतीच्या यशासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“महायुतीच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्याय पोहोचेल’, असे अभिजीत राणे यांनी सांगितले. “कामगारांच्या हक्कांसाठी लढताना आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करताना, मी आणि धडक कामगार युनियन पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभे आहोत. पक्षाचे विचार आणि धोरणं जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील, असा माझा ठाम विश्वास आहे.’ राणे यांनी या निवडणुकीत
महायुतीच्या विजयासाठी प्रामाणिकपणे योगदान देण्याचं आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे. ‘महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या पाठबळाने आपण महाराष्ट्रात स्थिरता आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहू. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेच्या विश्वासाचा विजय होईल आणि महायुतीच महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करेल,’ असे त्यांनी नमूद केले.
अभिजीत राणे आणि धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या यशासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला असून, ही निवडणूक महायुतीसाठी ऐतिहासिक विजयाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.