📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
‘बटेंगे तो कटेंगे’ला राधे माँ चा पाठिंबा
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशिम येथील सभेत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा हुंकार भरला आणि राजकीय वातावरण तापले. विधानसभेच्या रणधुमाळीत योगी आदित्यनाथ यांच्या एका वक्तव्याने वादाची ठिणगी पडली. आता या मैदानात राधे माँ यांनी पण उडी घेतली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात वाशिम येथील सभेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा हुंकार भरला. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातच नाही तर देशभरात दिसले.
त्यांच्यानंतर लागलीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, अशी भावनिक साद हिंदू मतदारांना घातली. त्यामुळे राज्यातील राजकारणात ध्रुवीकरणाचे कार्ड फेकल्या गेले. हिंदूंच्या एकगठ्ठा मतांसाठीच हा भावनिक खेळ सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर आता या वादात आध्यात्मिक क्षेत्रातील काही जणांनी उडी घेतली आहे. साधू-संतांसोबतच आता राधे माँ यांनी सुद्धा या वक्तव्यावर त्यांचे जाहीर मत मांडले आहे.
राधे माँ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याला जाहीर पाठिंबा दिला. ‘बटेंगे तो कटेंगे’,आणि ‘एक है तो सेफ है’ या भाजपच्या घोषणेला आणि नव्याने प्रचारात आलेल्या वक्तव्यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जेव्हा झाडू गोळा होतो तेव्हा त्यात शक्ती असते, असे राधे माँ म्हणाल्या. राधे माँ यापूर्वी पण अनेकदा वादात अडकल्या आहेत. त्यांच्या दरबारावर टीका झाली आहे. पण त्यांचा भक्त परिवार कमी होण्याऐवजी वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधे माँ यांच्या भूमिकेने आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
राधे माँ म्हणाली, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी सभेत जे काही सांगितले आहे, ते अगदी बरोबर सांगितले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’, आणि ‘एक है तो सेफ है’ हे देखील अगदी बरोबर आहे, कारण जेव्हा झाडू एकत्र येतो तेव्हा त्यात शक्ती असते. राधे माँ मुंबईच्या बोरिवलीमध्ये राहते आणि तिचे संपूर्ण कुटुंब मतदार आहे. राधे माँ आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.