📰 *MUMBAI MITRA EXCLUSIVE*
——-
◆ *धडक कामगार युनियनचा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला जाहीर पाठिंबा*
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे. महायुतीमध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष आणि इतर घटक पक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि जनतेच्या कल्याणाचा अजेंडा पुढे नेत असून, यासाठी त्यांनी महायुतीच्या यशासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“महायुतीच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्याय पोहोचेल,“ असे अभिजीत राणे यांनी सांगितले. “कामगारांच्या हक्कांसाठी लढताना आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करताना, मी आणि धडक कामगार युनियन पूर्ण ताकदीने
महायुतीच्या पाठीशी उभे आहोत. पक्षाचे विचार आणि धोरणं जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील, असा माझा ठाम विश्वास आहे.”राणे यांनी या निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी प्रामाणिकपणे योगदान देण्याचं आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे. “महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या पाठबळाने आपण महाराष्ट्रात स्थिरता आणि प्रगतीचा नवा अध्याय लिहू. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेच्या विश्वासाचा विजय होईल आणि महायुतीच महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करेल,“ असे त्यांनी नमूद केले.
अभिजीत राणे आणि धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या यशासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला असून, ही निवडणूक महायुतीसाठी ऐतिहासिक विजयाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
=====
महायुतीच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्याय पोहोचेल, कामगारांच्या हक्कांसाठी लढताना आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करताना, मी आणि धडक कामगार युनियन पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभे आहोत. पक्षाचे विचार आणि धोरणं जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
*-अभिजीत राणे*
संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन
=====