📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ मुंबईतील 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
◆ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या.
111 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मुंबईत अवघे 11 पोलीस निरीक्षक मुंबई बाहेरून आले. मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकाची मंजूर पदे 1032 आहेत. मात्र 31 जुलै पर्यंत कार्यरत 881 होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता 245 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आता नवीन पोलीस इन्स्पेक्टर येण्यास तयार नाहीत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली झाली होती. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या होत्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते.
—-
गुन्हे वाढल्यामुळे निवडणूक आयोगाची पोलीसांवर नाराजी
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय गुन्ह्यांबाबत आयोगाने चिंता व्यक्त केली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जप्त करण्यात आलेली रक्कम अडीच पट आहे. त्यामुळे या आघाडीवर अंमलबजावणी यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे, अशा सूचनाही आयोगाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राजकीय गुन्हे आणि जप्त मालमत्तेबाबत वरील सूचना केल्या. या बैठकीत निवडणूक कामांचा आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 175 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.