📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ मुंबई शहरात डान्स बारची चलती; बार मालकांकडून आचारसंहितेला केराची टोपली
◆ बिनधास्त तरुणी… दिलखेचक अदा!
◆ ऑर्केस्ट्राच्या नावाखाली मुंबईची रात्र रंगीन!
◆ मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास ‘देर रात’ डान्स बार
—-
◆ मुंबईतील डान्सबारना पोलीसांचे संरक्षण
◆ पोलीसांना, पोलीसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना डान्सबारचे हफ्ते?
◆ डान्सबारच्या पाठोपाठ मुंबईतील बार ॲण्ड रेस्टॉरंटही मध्यरात्री पर्यंत सुरु
◆ मध्यरात्री निवडणूकीचे सर्व व्यव्हाराचे केंद्र बिंदू होतायतं रात्रीचे हॉटेल्स?
—-
◆ मुंबई पोलीस आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज
◆ लेडीज सर्व्हिस बार सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते समाजसेवा शाखा युनिटपर्यंत प्रत्येक महिन्याला हप्ते?
◆ मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड सारखी परिस्थिती होत असल्याची चिन्हे?
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका जाहिर झाल्याअसून आचारसंहिता सुरु आहे असे असतानाही, मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्सबार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत हे डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे असे बोलले जात आहे कारण, त्यांच्या छुप्या पाठिंब्या शिवाय हे होऊ शकत नाही. बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रूपये जमा करीत आहेत. जमा झालेल्या रकमेतून पोलीसांना, पोलीसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना हफ्ते दिले जात आहेत. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
डान्सबार पहाटेपर्यंत चालू आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलीसांकडे
तक्रार देऊन देखील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे
मुंबईतील ऑर्केस्ट्राच्याआड सुरू असलेल्या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी होत मागणी आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी या सर्व प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
डान्सबारच्या पाठोपाठ आता मुंबईतील बार ॲण्ड रेस्टॉरंटनेही मध्यरात्री पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्याचे प्रकार सुरु केले आहेत. याठिकाणी मध्यरात्री निवडणूकीचे सर्व व्यव्हार होत असल्याची सुत्रांची माहिती आहे. मध्यरात्री सुरु असलेल्या बार ॲण्ड रेस्टॉरंटची सर्व माहिती स्थानिक पोलीसांना माहिती आहे. असे असतानाही, डान्सबारच्या पाठोपाठ आता हॉटेल सुरु झाले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यास कोण हप्ता देते? कोण हप्ता घेण्यास जातो? किती हप्ता दिला जातो? या सर्व वसूलीमध्ये ‘मिल स्पेशल’ची भुमिका महत्त्वाची आहे. हे सर्व प्रकार ‘दै. मुंबई मित्र’ उद्याच्या अंकात प्रसिध्द करणार आहे
यासंदर्भातील अनेक तक्रारी सुध्दा दिल्या गेल्या असताना, मुंबई पोलीसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र मुंबईत आहे. याउलट सिंडिकेटमधील बारचालक तक्रारदारालाच धमक्या देत आहेत, मारहाण करीत असल्याचे समजते.
—-
नियमितपणे यंत्रणेतल्या सगळ्यांना हप्ते?
नियमितपणे यंत्रणेतल्या सगळ्यांना हप्ते देतो. मात्र, अधूनमधून त्यांना जास्तीचे पैसे हवे असले की ते कारवाया करतात. सेक्शन गरम आहे असे सांगतात आणि आमच्याकडूनच जास्तीचे पैसे घेतात, असेही हे लोक सांगतात. लेडीज सर्व्हिस बार सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते समाजसेवा शाखा युनिटपर्यंत प्रत्येक महिन्याला हप्ते द्यावे लागतात, असेही सांगितले जाते.
—-
मुलींची डान्सबारमध्ये आणण्याची सोय
पूर्वी डान्स बारमध्ये ज्या पद्धतीने मुली आणल्या जायच्या, तोच प्रकार आता पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. या भागात अपार्टमेंटमधून अशा मुलींची राहण्याची व रात्री डान्स बारमध्ये आणण्याची सोय केली जाते. एक मोठी अर्थव्यवस्था या सगळ्यांच्या मागे काम करत आहे. काही डान्स बारमध्ये तर क्रेडिट कार्ड देत बिले भरली जातात, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नोटा उधळल्या जातात. वरपर्यंत हात असणारे राजकारणी आले की त्यांची वेगळी सोय केली जाते.
—-
बारमालकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या
मुंबई शहरात डान्स बारची चलती असताना छापा घालण्यासाठी पोलीस पथक आल्याची कुणकुण आधीच मिळावी यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या बारमालक, चालक करीत आहेत. बाहेरील पानटपरी चालक बटण दाबून आतील व्यवस्थापकाला सूचित करणे. पुढून एक दार तर मागून दोन किंवा तीन दरवाजे, चोर कप्पे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अशा विविध उपाययोजना बारच्या आत-बाहेर दिसतात.
—-
डान्सबार बनले ड्रग्ज माफियांचे केंद्र
डान्स बार ड्रग्ज माफियांचे केंद्र बनू लागला आहे. अनेक ठिकाणी ड्रग्ज पहायला मिळत आहेत, ते पाहता आता डान्स बारही ड्रग्जने हातपाय पसरले गेल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने अवैध धंद्यांचे जाळे डान्स बार विणले जात आहे ते वेळीच रोखले पाहिजे, अन्यथा काही वर्षांपूर्वी मुंबईत ज्या पद्धतीने अंडरवर्ल्डने आपले हातपाय पसरले होते, तशीच परिस्थिती मुंबईची पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही. असे जाणकार सांगतात.
—-
◆ मध्यरात्री पर्यंत सुरु असणारे बार?
* एरो बार पंजाब (अंधेरी पूर्व)
* ग्रीटिंग्स बार (अंधेरी पूर्व)
* मेट्रो बार (अंधेरी पूर्व)
* नविक बार (अंधेरी पूर्व)
* डिलाइट बार (अंधेरी पूर्व)
* अपना ढाभा बार (एमआयडीसी)
* साई प्रसाद बार (अंधेरी पूर्व)
* स्वस्तिक बार (गोरेगाव पूर्व)
* प्लॅटिनम बार (बांगुर नगर)
* सनशाईन बार (बांगुर नगर)
* गुरु कृपा बार (मालाड पश्चिम)
* साई प्रसाद बार (मालाड पश्चिम)
* मीना बार (दहिसर पूर्व)
* कृष्णा बार (दहिसर पूर्व)
* संजोग बार कस्तुरबा मार्ग (बोरिवली पूर्व)
=====
◆ मुंबईत मध्यरात्री सुरु असलेले डान्सबार?
* बेवॉच बार दादर
* तंदूर बार माहीम
* रॉयल माहीम
* ग्रीन पार्क माहीम
* टारझन माहीम
* कॅम्पस बार विलेपार्ले (पूर्व)
* मधुबन बार विलेपार्ले (पूर्व)
* पुष्पक बार सांताक्रूझ (पूर्व)
* फिला बार सहार रोड
* दाशी बार सहार रोड
* स्पाइस बार साकी नाका
* नाईट लव्हर बार एमआयडीसी
* व्हाईट हाऊस बार
* मानसी बार अंधेरी (पूर्व)
* मनशा बार अंधेरी (पूर्व)
* एलपी बार अंधेरी (पूर्व)
* राम भवन बार अंधेरी (पूर्व)
* सी क्वीन बार अंधेरी (पूर्व)
* क्लासिक बार अंधेरी (पूर्व)
* उर्वशी बार अंधेरी (पूर्व)
* पिंक प्लाझा अंधेरी (पूर्व)
* श्रुती बार अंधेरी (पूर्व)
* गुलाबी बार अंधेरी (पूर्व)
* समित पॅलेस बार अंधेरी (पूर्व)
* दीपा बार अंधेरी (पूर्व)
* रत्ना पार्क अंधेरी (पूर्व)
* रत्न महल बार अंधेरी (पूर्व)
* गोल्डन पॅलेस अंधेरी (पूर्व)
* रॉयल बार एमआयडीसी, साकीनाका
* तारा बार गोरेगाव (पूर्व)
* सोना बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* मोऱ्या बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* काका बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* समुद्रा बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* सोनल बार दिंडोशी मालाड (पूर्व)
* आंचल बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* उजाला बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* सावली बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* ललित बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* नित्यानंद बार समता नगर, कांदिवली (पूर्व)
* आशियाना बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* गुडिया बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* पार्क साइड बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* क्लब 9 बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* कावेरी बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* चारवॉक बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* चारवॉक फर्स्ट बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* उत्सव बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* समर पार्क बार कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व)
* न्यू पार्क साइड बार दहिसर (पूर्व)
* चिरंजीवी सीबीआर बार दहिसर (पूर्व)
* कव्वाली बार दहिसर (पूर्व)
* राज पॅलेस दहिसर (पूर्व)
* मीना बार दहिसर (पूर्व)
* समुद्रा बार दहिसर (पूर्व)
* गोल्डन पॅलेस बार दहिसर (पूर्व)
* सूरज बार दहिसर (पूर्व)
* जय प्रीथ बार दहिसर (पूर्व)
* गोविंदा बार दहिसर (पूर्व)
* आशिष बार दहिसर (पूर्व)
* संदेश बार अंधेरी (पूर्व)
* शीतल बार दहिसर (पूर्व)
* शर्मिली बार दहिसर (पश्चिम)
* स्टार नाईट बार चारकोप, कांदिवली (प.)
* संध्या बार चारकोप कांदिवली (प.)
* एस-4-यु बार कांदिवली (प.)
* दावत बार कांदिवली (प.)
* विजय पॅराडाईज बार कांदिवली (प.)
*मेरिडियन बार कांदिवली (प.)
* रंगोली बार कांदिवली (प.)
* स्वागतम बार मालाड (प.)
* अशोका बार मालाड (प.)
* एलडी बार मालाड (प.)
* व्हीपी -9 बार मालाड (प.)
* मूड बार मालाड (प.)
* अरुणा बार मालाड (प.)
* जशन बार मालाड (प.)
* मोहन बार मालाड (प.)
* चायना गेट बार बांगुर नगर
* मेहफिल बांगुर नगर
* स्नेहा बार बांगुर नगर
* बॉलीवूड बार ओशिवरा
* स्टार इन बार अंबोली
* विलास बार आंबोली
* मेट्रो बार ओशिवरा
* गोल्डमाईन बार डीएन नगर
* एस-54 सी बर्ड सांताक्रूझ (प.)
* सारंग बार सांताक्रूझ (प.)
* गोल्डन बिन बार सांताक्रूझ (प.)
* सिंदूर बार सांताक्रूझ (प.)
* नशा बार सांताक्रूझ (प.)
* एलडी बार सांताक्रूझ (प.)
* लव्हली बार सांताक्रूझ (प.)
* स्टार नाईट बार सांताक्रूझ (प.)
* क्वीन्स बार सांताक्रूझ (प.)
* नीलम बार खार (प.)
* लव्ह बर्ड बार सांताक्रूझ (प.)
* रुबी एमआयडीसी साकीनाका
* सरोज पॅलेस साकीनाका
* माधुरी साकीनाका
* मनिषा साकीनाका
* के -9 -कौस्तुभ कांदिवली (प.)
* एसपी-साई पॅलेस कांदिवली (प.)