📰 MUMBAI MITRA वेध निवडणूकीचा…
——-
◆ …अखेर लढत महायुती विरुध्द महाआघाडी!
◆ महायुतीच्या 182 जागा जाहीर
◆ मविआचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा निवडणूक फक्त 27 दिवसांवर येऊन ठेपली आहे. आजपासून बरोबर एक महिन्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या सगळ्यात उमेदवार यादी जाहीर करण्यात महायुतीने म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी धडाका लावत आत्तापर्यंत 182 उमेदवारांची नवे जाहीर केली आहेत. मात्र महाविकास आघाडीने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.
महायुतीमधील भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. तर, काही विद्यमान आमदारांचे तिकीटही कापण्यात आले. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच, काही ठिकाणी घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. आता, अजित पवारांनी 38 उमेदवारांची राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली असून आमदार सुनिल टिंगरेंना वेटिंगवर ठेवले आहे. तर, विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापण्यात आले.त्यामुळे, महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप 106 उमेदवारांच्या नावांची प्रतिक्षा आहे. तर, महाविकास आघाडीच्या 288 मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिक्षा महाराष्ट्राला आहे.
—-
शिवसेना शिंदे गट 45 उमेदवारांची यादी
एकनाथ शिंदे- कोपरी पाचपाखाडी, मंजुळाती गावित- साक्री (अनुसूचित जाती), चंद्रकांत सोनावणे चोपडा (अनुसूचित जाती), जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील, किशोर पाटील- पाचोला, चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर, संजय गायकडवाड- बुलढाणा, संजय रायमुलकर- मेहकर (अनुसूचित जाती), अभिजित अडसूळ- दर्यापूर (अनुसूचित जाती), आशिष जैस्वाल- रामटेक, नरेंद्र भोंडेकर- भंडारा (अनुसूचित जाती), संजय राठोड- दिग्रस, बालबाजी कल्याणकर- नांदेड उत्तर, संतोष बांगर- कळमनुरी, अर्जुन खोतकर- जालना, अब्दुल सत्तार- सिल्लोड, प्रदीप जैस्वाल- छत्रपती संभाजीनगर मध्य, संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अनुसूचित जाती), विलास भुमरे -पैठण, रमेश बोरनारे- वैजापूर, सुहास कांदे- नांदगाव, दादाजी भुसे- मालेगाव बाह्य, प्रताप सरनाईक ओवळा माजीवडा, प्रकाश सुर्वे- मागाठाणे, मनिषा वायकर- जोगेश्वरी (पूर्व), दिलीप लांडे- चांदिवली, मंगेश कुडाळकर- कुर्ला (अनुसूचित जाती), सदा सरवणकर- माहीम, यामिनी जाधव भायखळा, महेंद्र थोरवे- कर्जत, महेंद्र दळवी- अलिबाग, भरतशेठ गोगावले- महाड, ज्ञानराज चौगुले- उमरगा (अनुसूचित जाती), तानाजी सांवंत- परंडा, शहाजीबापू पाटील- सांगोला, महेश शिंदे- कोरेगाव, शंभूराज देसाई-पाटण, योगेश कदम- दापोली, उदय सामंत- रत्नागिरी, किरण सामंत- राजापूर, दीपक केसरकर- सावंतवाडी, प्रकाश आबिटकर- राधानगरी, चंद्रदीप नरके- करवीर, सुहास बाबर- खानापूर.
—-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
बारामती- अजित पवार, आंबेगाव- दिलीप वळसे पाटील, कागल- हसन मुश्रीफ,परळी- धनंजय मुंडे, दिंडोरी- नरहरी झिरवाळ, अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम, श्रीवर्धन- आदिती तटकरे, अंमळनेर- अनिल भाईदास पाटील, उदगीर- संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले, माजलगाव- प्रकाश दादा सोळंके, वाई- मकरंद पाटील, सिन्नर- माणिकराव कोकाटे, खेड आळंदी दिलीप मोहिते पाटील, अहमदनगर शहर- संग्राम जगताप, इंदापूर- दत्तात्रय भरणे, अहमदपूर- बाबासाहेब पाटील, शहापूर- दौलत दरोडा, पिंपरी- अण्णा बनसोडे, कळवण- नितीन पवार, कोपरगाव- आशुतोष काळे, अकोले-किरण लहामटे, वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण- शेखर निकम, मावळ- सुनील शेळके, जुन्नर- अतुल बेनके, मोहोळ- यशवंत माने, हडपसर- चेतन तुपे,देवळाली- सरोज आहिरे,चंदगड राजेश पाटील, इगतुरी- हिरामण खोसकर, तुमसर- राजे कारमोरे,पुसद -इंद्रनील नाईक,अमरावती शहर- सुलभा खोडके, नवापूर- भरत गावित, पाथरी- निर्णला विटेकर, मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला.
==========
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.
—
उबाठाची 65 जणांची यादी जाहीर
चाळीसगाव : उन्मेश पाटील, पाचोरा: वैशाली सुर्यवंशी,मेहकर (अजा): सिध्दार्थ खरात, बाळापूर: नितीन देशमुख, अकोला पूर्व: गोपाल दातकर, वाशिम (अजा): डॉ. सिध्दार्थ देवळे, – बडनेरा: सुनील खराटे, रामटेक: विशाल बरबटे,वणी: संजय देरकर, लोहा: एकनाथ पवार,कळमनुरी: डॉ. संतोष टारफे,परभणी: डॉ. राहुल पाटील, गंगाखेड: विशाल कदम,सिल्लोड: सुरेश बनकर, कन्नड: उदयसिंह राजपुत,संभाजीनगर मध्य: किशनचंद तनवाणी, संभाजीनगर प. (अजा): राजु शिंदे, वैजापूर: दिनेश परदेशी, नांदगांव: गणेश धात्रक, मालेगांव बाह्य : अद्वय हिरे, निफाड: अनिल कदम, नाशिक मध्य: वसंत गीते, नाशिक पश्चिम: सुधाकर बडगुजर, पालघर (अज) : जयेंद्र दुबळाबोईसर (अज): डॉ. विश्वास वळवी, भिवंडी ग्रामीण (अज): महादेव घाटळ, अंबरनाथ (अजा): राजेश वानखेडे, डोंबिवली: दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामिण: सुभाष भोईर, ओवळा माजिवडा: नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी : केदार दिघे, ठाणे : राजन विचारे, ऐरोली: एम. के. मढवी, मागाठाणे: उदेश पाटेकर, विक्रोळी : सुनील राऊत,भांडुप पश्चिम: रमेश कोरगावकर,जोगेश्वरी: पूर्व अनंत (बाळा) नर, दिंडोशी : सुनील प्रभू, गोरेगांव: समीर देसाई,अंधेरी पूर्व: ऋतुजा लटके,चेंबूर: प्रकाश फातर्पेकर, कुर्ला (अजा): प्रविणा मोरजकर, कलीना: संजय पोतनीस,वांद्रे पूर्व: वरुण सरदेसाई, माहिम: महेश सावंत, वरळी: आदित्य ठाकरे, कर्जत: नितीन सावंत,उरण: मनोहर भोईर, महाड: स्नेहल जगताप, नेवासा: शंकरराव गडाख, गेवराई: बदामराव पंडीत, धाराशिव: कैलास पाटील, परांडा: राहुल ज्ञानेश्वर पाटील,बार्शी: दिलीप सोपल, सोलापूर दक्षिण: अमर रतिकांत पाटील, सांगोले: दिपक आबा साळुंखे,पाटण: हर्षद कदम, दापोली: संजय कदम, गुहागर: भास्कर जाधव, रत्नागिरी: सुरेंद्रनाथ (बाळ) माने, राजापूर: राजन साळवी, कुडाळ: वैभव नाईक, सावंतवाडी: राजन तेली, राधानगरी: के.पी. पाटील, शाहूवाडी: सत्यजीत आबा पाटील