📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ सदनिकेच्या नावाखाली 16 कोटींच्या फसवणूकप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा
====
◆ फारुक पारेख परिवाराची फसवणूक;
कलम 120बी, 406, 420 व महाराष्ट्र ठेवीदारांच्या अधिनियम 3 व 4 अंतर्गत बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
◆ पोलीसांकडून अद्याप कारवाई नाही;
आरोपी मेहमुद हसन कादरी, फहीद मेहमूद कादरी, बिल्किस मेहमूद कादरी पैकी फहीद कादरी दुसऱ्या गुन्ह्यात कैदेत
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बांद्रा येथील अल्मेहमुद अर्पाटमेंटच्या पुनर्विकास प्रकल्पात सहाव्या मजल्यावर 2000 स्क्वेअर फुटांचे घर देतो सांगून टप्प्या-टप्प्याने 4 कोटी रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपखाली मेहमुद हसन कादरी, फहीद मेहमूद कादरी व बिल्किस मेहमूद कादरी विरोधात बांद्रे (प.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 18 वर्षांपासून तक्रारदाराला सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याचा आरोप असून ह्या प्रकरणाचा तपास आता बांद्रा पोलीस करीत आहेत. बांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 120 बी, 406, 420 व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार फारुक हाजीलतिफ पारेख यांनी दिलेल्या तक्रारीत, मेहमुद हसन कादरी, फहीद मेहमूद कादरी व बिल्किस मेहमूद कादरी यांनी 2007 मध्ये त्यांच्या फातिमा लॉज, अल्मेहमुद व आसिया मनोर या तीन इमारती असून अल्मेहमुद इमारतीचे 4 मजल्याचे काम पुर्ण झाले आहे व 5 व 6व्या मजल्याच्या सीआरझेड, पालिकेकडून सीसी आदी परवानग्या बाकी असून त्यासाठी 4 कोटी रुपये हवे असल्याचे सांगितले. त्याबदल्यात 2000 स्क्वेअर फुटांचा 6व्या मजला संपुर्ण फारुक यांना देतील असे सांगितले. फारुक यांनी मेहमुद हसन कादरी व त्यांच्या परिवारावर विश्वास ठेऊन गुंतवणुक करण्यास तय्यारी दर्शवली. यामध्ये 2013 मध्ये बांधकाम पुर्ण होईल असे आश्वासन कादरी ने फारुक यांना दिले होते, त्यानुसार फारुक यांनी प्रथम 50 लाख टोकन म्हणून दिले.
अल्मेहमुद इमारतीचे 5व्या मजल्याचे काम सुरु झाले. त्यानंतर फारुक यांनी 2008 मध्ये फेब्रुवारीमध्ये 50 लाख नोव्हेंबरमध्ये 50 लाख, 2009 मध्ये ऑक्टोबरमध्ये 84 लाख, 50 लाख, 2010 मध्ये 1 कोटी 16 लाख असे एकूण 4 कोटी रुपये दिले. 2013 मध्ये पाचव्या मजल्याचे काम पुर्ण झाले परंतू सहाव्या मजल्याचे काम मात्र सुरु झाले नाही. याबाबतीत फारुक यांनी मेहमूद यांना विचारणा केली असता बांधकामाच्या परवानग्या मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर फारुक पारेख यांना संशय येऊ लागला म्हणून त्यांनी मेहमुद हसन कादरी, फहीद मेहमूद कादरी व बिल्किस मेहमूद कादरी यांच्या सोबत 2013 मध्ये सामंजस्य करार (एमओयु) केला. ज्यामध्ये 2018 पर्यंत फारुक पारेख यांना सदनिकेचा ताबा मिळण्यात येईल व जो पर्यंत ताबा मिळत नाही तोपर्यंत भाडे दिले जाईल असे सांगितले.
नोव्हेंबर 2017 मध्ये फारुक हाजीलतिफ पारेख यांनी कादरी यांना विचारणा केली असता, कादरी यांनी अल्मेहमुद अर्पा, फातिमा लॉज, मॉन दिजायर व आसिया मनोर या चारही इमारतींचा मिळून एक मोठा कल्स्टर विकसीत करण्यात येत असल्याचे सांगितले व त्यात 3000 स्क्वेअर फुटांचे घर देतो असे सांगितले.
दरम्यान, कादरी यांनी पारेख यांना 2018 ते 2023 च्या दरम्यान 38 लाख 65 हजार रुपये भाडे स्वरुपात दिले. कलस्टर चे काम होत असल्याचे दिसत नसल्याने कादरी यांनी पारेख यांना बंद खात्याचे 25 लाखांचे दोन धनादेश दिले. यावर मेहमुद हसन कादरी, फहीद मेहमूद कादरी व बिल्किस मेहमूद कादरी हे आपली फसवणूक करत असल्याचे फारुक पारेख यांना समजले.
यावर फारुक पारेख यांनी विचारपूस सुरु केली असता, अल्मेहमुद अर्पामेंटचा सहावा मजला आसिफ पटेल, यास्मिन सौदागर व आदिल दर्वेश यांना ही विकण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे समजले. यानंतर फारुक हाजीलतिफ पारेख आपल्या परिवारासह मेहमुद हसन कादरी, फहीद मेहमूद कादरी व बिल्किस मेहमूद कादरी यांच्या घरी गेले असता, त्यांनी सर्व चूक मान्य केली व बाजारभावाप्रमाणे 16 कोटी रुपयांचा धनादेश 2 नोव्हेंबर 2023 रोजी दिला. हा धनादेश पारेख यांनी बँकेत टाकला असता तो बाऊन्स झाला. त्यानंतर पारेख यांनी बांद्रे पोलीस ठाणे गाठले व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
बांद्रे पोलीस ठाण्याकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून, तीन आरोपींपैकी फहीद मेहमुद कुरेशी हा दुसऱ्या गुन्ह्यात कैदेत असल्याचे तपास अधिकारी विजय चौधरी यांनी सांगितले.