📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ ओमकार बिल्डर विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
◆ ओमकार बिल्डरचे सिईओ राजीव अग्रवाल, सिनियर मॅनेजर श्रीनिवासन व मॅनेजर राजेश कदम यांनी तडीपार करण्याची धमकी दिली असल्याचा हरिश कानगेंचा आरोप
◆ जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र ठरवलेले मातंग समाजाचे मंदीर 13 वर्षापुर्वी मध्यरात्री 3.30 वाजता तोडल्याचा आरोप
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
ओमकार बिल्डर विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार ‘साई नरसोबा मित्र मंडळ’चे अध्यक्ष हरिश कानगे यांनी तक्रार दिली आहे. ज्यामध्ये त्यांना ओमकार बिल्डरचे सिईओ राजीव अग्रवाल, सिनियर मॅनेजर श्रीनिवासन व मॅनेजर राजेश कदम यांनी तडीपार करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप हरिश कानगें यांनी केला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे उत्तर रिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये त्यांनी, मालाड (पू.) येथील जय हिंद सोसायटी ए-2-2108 येथे एसआरए च्या प्लानमध्ये येते असलेले व जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र ठरवलेले मातंग समाजाचे मंदीर 13 वर्षापुर्वी मध्यरात्री 3.30 वाजता तोडले व मंदीर पुन्हा बांधण्यासाठी अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हरिश कानगे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पुन्हा नव्याने मंदीर बांधण्यासाठी किंवा थकीत भाडे विचारण्यासाठी सायनच्या कार्यालयात गेलो असता, तेथे ओमकार बिल्डर्सचे सिईओ राजीव अग्रवाल, सिनियर मॅनेजर श्रीनिवासन व मॅनेजर राजेश कदम यांनी मला तडिपार करण्याची धमकी दिली. ‘जर मंदिराबाबत विचारले तर, तुला या शहरातून तडीपार करणार असे धमकी देत आहेत.’ एसआरएच्या प्लॅनमध्ये मंदीर येत असल्यामुळे, ओमकार कंपनीचे मालक बाबुलाल वर्मा यांनी रात्री 3.30 वाजता मंदीर तोडले आहे. 13 वर्ष पुर्ण झाली आहेत आणि 12 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांनी मंदीर पात्र घोषित केले आहे. मंदिराचा एन. एक्स नं 123 आहे. अनेकवेळा मंदिर पुन्हा निर्माण करण्यासाठी विचार केला असता मला वारंवार मानसिक त्रास व तडीपार करण्याची धमकी देत आहे. कारण हे मंदीर मातंग समाजाचे आहे. मला वारंवार धमकी देत आहेत, अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे. याबाबतीत ‘दै. मुंबई मित्र’ने ओमकार बिल्डरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.