*MUMBAI MITRA EXPOSE*
——-
◆ *शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणारा जमान शेख अटकेत*
◆ फसवणुकीचा आकडा 7 कोटींच्या घरात?
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या मरोळ अंधेरी येथील जमान शेख याला पवई पोलीसांनी अटक केली आहे. शेअर मार्केट पैसे दुप्पट करुन देतो असे सांगून जमान याने तब्बल 7 कोटी रुपयांची फसवणुक केली असल्याचे समजते. जमान विरोधात 3 डिसेंबर 2023 रोजी पवई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 420 व 406 अन्वये गुन्हा दाखल होता. परंतू मागील 10 महिन्यांपासून जमान पोलीसांना गुंगारा देत होता, अखेर आज त्याला अटक करण्यात आली.
तक्रारदार आकिब खान यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन जमानला अटक करण्यात आली आहे. या तक्रारीत 6 जणांनी पोलीसांना आपला जबाब दिला होता ज्यामध्ये तौसिफ खान, आबिद खान, अराफत वारसी, अन्वर शेख, आसिफ शेख, अलमास शेख यांनी जमानला एकूण 55 लाख 66 हजार 800 रुपये रक्कम गुंतवण्यासाठी दिली होती. अशाप्रकारची शेकडो नागरीकांनी जमान ने फसवणूक केली असल्याचे समजते. ज्याचा आकडा हा तब्बल साडे 7 कोटींच्या घरात असून, यावर आता पवई पोलीस कशाप्र्रकारे कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.