📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ वसईच्या ब्लिंकीट स्टोरला कामगार नेते अभिजीत राणेंची ‘धडक’चे भेट
◆ वसई ब्लिंकीट स्टोरच्या कामगारांनी घेतले ‘धडक’चे प्रतिनिधित्व!
——–
विशेष प्रतिनिधी, वसई
वसई (प.) शास्त्रीनगर येथील ब्लिंकीट स्टोरच्या डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांनी आपले हक्क व मागण्यांसाठी धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व स्वीकारले असून, स्टोर कडून कामगारांचे आयडी होल्ड करण्याचे प्रकार होत आहेत., कामगारांना यापूर्वी मिळणाऱ्या रकमेत अचानक घट करण्यात आली आहे., मागील 3-4 वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांच्या जागी नवे कामगार भरती करून जाणिवपूर्वक त्रास दिला जातो., कामगारांना अपशब्द बोलले जातात., तक्रार करणाऱ्या कामगारांचे आयडी होल्ड केले जातात आदी विविध मागण्यांसाठी कामगारांच्या विनंती वरून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मागील आठवड्यात ‘धडक’ भेट दिली.
यावेळी विरार ते अंधेरी पर्यंत ब्लीनकीटचे काम सांभाळणारे कलस्टर मॅनेजर राहुल त्रिपाठी यांच्यामध्ये चर्चा पार पडली व यावर तुर्तास तोडगा काढण्यात आला. यावेळी सोबत युनियन चे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम कुमार, मुंबई उपाध्यक्ष बबन आगडे, जनसंपर्क अधिकारी गिरीराज शुक्ला, गोविंदरसिंग नागी आदी पदाधिकारी उपस्थित होते.