📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ 8 लाख 98 हजार रुपयांच्या धनादेशाचे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते कामगारांना वाटप
◆ ‘धडक’ने मिळवून दिला रुणवालच्या २४ कामगारांना न्याय
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
डोंबिवलीतील मे. रुणवाल गार्डनच्या बांधकाम साईटवर मे. जे.सी.सी. प्रा. लि. अंतर्गत कंत्राटी स्वरूपावर काम करणाऱ्या 24 कामगारांचे वेतन कंत्राटदार कंपनी कडून देण्यात आले नव्हते. याबाबतीत यासर्व कामगारांनी धडक कामगार युनियनचे दार ठोठावले. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे कामगारांवर झालेला अन्याय व त्यांची घरची हलाकीची असलेली परस्थिती पाहून त्यांना तुम्हाला न्याय मिळवून देणारच असा ठाम विश्वास दिला होता.
युनियनच्या माध्यमातून सातत्याने याचा पाठपुरावा करण्यात आला. याबाबतीत कल्याणच्या सहाय्य्क कामगार आयुक्त कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली ज्यामध्ये मे. रुणवाल ग्रुप, व्यवस्थापक/विकासक तसेच सुभाष रुणवाल, अध्यक्ष यांना सहभागी करण्यात आले. धडक कामगार युनियनच्या पाठपुराव्या अंती रोजी रुणवाल ग्रुपने कामगारांना त्यांचे थकलेले वेतन देण्याची तय्यारी दर्शवली. 13/8/2024 रोजी धडक कामगार युनियन व सहाय्य्क कामगार आयुक्त, कल्याण यांना समोर रुणवाल ग्रुप कडून सर्व कामगारांना त्यांच्या थकलेल्या वेतनाचे एकूण 8 लाख 98 हजार 303 रुपयांचे धनादेश देण्यात आले.
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी याबद्दल कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्त अ. वी. क्षीरसागर यांचे अभिनंदन केले. सर्व कामगारांनी धडक कामगार युनियन व अभिजीत राणे यांचे आभार मानले व त्यांच्या हस्ते ‘धडक’ कार्यालयात धनादेश सुपूर्त करण्यात आले. हा संपूर्ण लढा यशस्वी करण्यासाठी धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष व ठाणे निरीक्षक बबन आगडे यांनी विशेष मेहनत घेतली.
—–
> याप्रकरणात कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्त अ. वी. क्षीरसागर यांनी कामगारांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल धडक कामागार युनियनच्या वतिने आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.
> -अभिजीत राणे
> संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन
