विशेष प्रतिनिधी, मुंबई
दै. मुंबई मित्र चे सल्लागार संपादक स्व. विजय वैद्य यांच्या स्मरणार्थ आज ‘दै. मुंबई मित्र’कडून कार्यालयाच्या आवारात शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक यांच्या माध्यामातून आयोजित या शोकसभेस ‘दै. मुंबई मित्र’च्या संपादीका अनघा राणे व विजय वैद्य यांचे चिरंजीव वैभव आणि विक्रांत वैद्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी विजय वैद्य व त्यांच्या ‘दै. मुंबई मित्र’च्या बाबतीत होत असलेल्या चर्चांची आठवण उपस्थितांना सांगितली.
कार्यक्रमास ‘दै. मुंबई मित्र’चे ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी, ‘दै. मुंबई मित्र’चे पत्रकार नितीन तोरस्कर, वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. लि. चे सिईओ अमोल राणे, पत्रकार बि. के. पांडे, नॅशनल ह्युमन राईट्स अँटी क्राईम ॲण्ड अँटी करप्शन ब्युरो चे अध्यक्ष मोहित गुप्ता आदी मान्यवर व लेखक, पत्रकार तसेच धडक कामगार युनियनचे पदाधिकारी झुल्लुर यादव, अभय झा, रवी बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित शोकसभेत सर्व मान्यवरांनी स्व. विजय वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केली व दोन मिनिट सर्वांनी उभे राहून श्रध्दांजली वाहिली.
विजय वैद्य यांचे चिरंजीव यांनी विजय वैद्य यांची ‘दै. मुंबई मित्र’ बाबतची आपली आठवण सांगताना, आमचे बाबा ‘दै. मुंबई मित्र’साठी अग्रलेख लिहित असत, यावेळी ते प्रत्येकवेळी ‘दै. मुंबई मित्र’चा अग्रलेख व ‘लोकसत्ता’चा अग्रलेख कशाप्रकारे एकाच विषयावर प्रसिध्द झाला आहे, हे अर्वजून सांगत. असे यावेळी ते म्हणाले.
‘दै. मुंबई मित्र’च्या संपादिका यांनी यावेळी बोलताना, ‘आमचे व विजय वैद्य यांचे अतिशय घरोब्याचे संबंध होते. ‘दै. मुंबई मित्र’च्या जडणघडणीत त्यांचे खुप मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने ‘दै. मुंबई मित्र’मध्ये निर्माण झालेली पोकळी न भरुन निघण्यासारखी आहे. असा शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.
‘दै. मुंबई मित्र’चे ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे, यावेळी बोलताना, काहि दिवसांपुर्वीच त्यांचे माझे बोलणे झाले होते, त्यावेळी त्यांनी अभिजीत राणे यांच्याबद्दल मला विचारले होते आणि अचानक माहिती आली की वैद्य सर गेले… मनाला चटका लाऊन जाणारी ही घटना आहे. असा शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली. यावेळी ‘दै. मुंबई मित्र’च्या कर्मचारी वृंदकडून विजय वैद्य यांना पुष्प अपर्णकरुन श्रध्दांजली वाहण्यात आली.
====
◆ *समुह संपादक अभिजीत राणे यांनी वाहिली श्रध्दांजली*
बोरिवलीमध्ये आयोजित शोकसभेस दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांच्या सोबत च्या आठवणींना उजाळा देत, ‘दै. मुंबई मित्र’ साठीचे त्यांचे योगदान अतिशय मोठे असून माझी आई अनघा राणे यांचे त्यांच्याशी अतिशय घरोब्याचे संबंध होते. अखेर श्वासापर्यंत त्यांनी आपली लेखणी सोडली नाही. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचे मार्गदर्शन वेळोवेळी मला लाभले. असे यावेळी ते म्हणाले.
====
◆ *विजय वैद्य पुरस्कार सुरु करण्याची मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघची मागणी*
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मिळत आहे. आता विजय वैद्य हे आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची रक्कम यापुढे त्यांच्या पत्नी वैशाली विजय वैद्य यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.वैद्य यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष म्हणून केलेली हॅट्ट्रिक, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून केलेली हॅट्ट्रिक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे उभारलेले समाजसेवेचे प्रचंड मोठे कार्य, त्यांचे वाचक आणि ग्रंथालय चळवळीतील मोठे योगदान लक्षात घेऊन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विजय वैद्य यांच्या नांवाने एखादा पुरस्कार सुरु करावा, अशी सूचना वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत करण्यात आली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली विजय वैद्य यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार रमेश कीर यांनी विजय वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शोकसभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, वैभव विजय वैद्य, राजन पारकर, खंडूराज गायकवाड, योगेश त्रिवेदी, नितीन सावंत, सदानंद खोपकर, अभय देशपांडे, महेश पावसकर, गिरीश वसंत त्रिवेदी, प्रवीण राऊत, अनंत नलावडे, आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत विजय वैद्य यांच्या गौरवपूर्ण कार्याला उजाळा दिला.
