📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ मालाडमधील ‘बालाजी इनक्लेव’ उच्चभ्रु सोसायटीतील घटना
◆ मोलकरणीचा घर काम करणाऱ्या घरावर डल्ला
◆ एक लाख रुपये रोकड, 2 सोन्याच्या अंगठ्या व 10 ते 15 हजारांचे कपडे घेऊन मोलकरीण शबाना खातुन (नायरा) फरार
◆ मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलीसांना सीसीटिव्ही टेज व सीडीआर मिळवण्यात यश; गुन्हा शोध शाखेकडे वर्ग
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील मालाडमध्ये बालाजी इनक्लेव या उच्चभ्रु सोसायटीत चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचे दिसून आले. घर काम करणाऱ्या मोलकरणीने आपल्या मालकीणीचा विश्वास संपादन करुन, तिच्याच घरावर हात साफ करुन पसार झाली आहे. एक लाख रुपये रोकड, 2 सोन्याच्या अंगठ्या व 10 ते 15 हजारांचे कपडे यावेळी चोरी करण्यात आले आहेत. याबाबतीत तक्रारदार मनप्रितकौर सिंग यांच्या तक्रारीनंतर मालाड पोलीस ठाण्यात आरोपी शबाना खातुन (नायरा) हिच्या विरोधात बिएनएस कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी घटनेचे सिसिटिव्ही फुटेज व सिडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढले आहे. हा गुन्हा शोध शाखेला वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस माहितीनुसार, मनप्रितकौर सिंग या मालाड मधील बालाजी इनक्लेव या सोसायाटीत भाड्याने राहतात. त्यांनी 6 महिन्यांपुर्वी मुळची बंगालची असणाऱ्या शबाना खातुन उर्फ मायराला घरकामासाठी कामाला ठेवले. मनप्रितकौर 26 जुलै रोजी त्यांच्या व्यक्तीक कामानिमित्त पंजाबला आपल्या गावी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाड्यासाठी ठेवलेले 1 लाख रुपये रोकड, 2 सोन्याच्या अंगठ्या आपल्या लॉकर मध्ये ठेवल्या होत्या व चावी एका कपाटात ठेवली होती, त्यावेळी शबाना ही त्यांच्या बरोबर होती. मनप्रित दररोज शबानाला व्हिडीओ कॉल करुन माहिती घेत असत. अचानक 6 ऑगस्ट रोजी शबानाचा फोन बंद आला. त्यानंतर 6 ऑगस्ट पासून 10 तारखेपर्यंत मनप्रित दररोज संपर्क करण्याचा प्रयत्न करत होत्या परंतू संपर्क होत नव्हता. 10 ऑगस्टला जेव्हा मनप्रित मुंबईत आल्या तेव्हा शबाना घरी नव्हती पैसे व सोने ठेवलेले कपाटही उघडे होते व व तेथील सर्व सामान गायब झालेले होते व कपाटात ठेवलेली चावी सुध्दा जागेवर नव्हती. तेव्हा त्यांना खात्री पटली की शबानाने घरात चोरी केली आहे.
मनप्रितकौर सिंग यांनी ‘दै.मुंबई मित्र’ला दिलेल्या माहितीत,त्यांचे पती उज्जैन ला महादेवाच्या दर्शनाला गेले होते. आमच्याच सोसायटीत लहानमुलांना संभाळायचे काम करत असल्याने आमच्या घरात एक श्वान असल्याने आम्ही शबानाला नोकरी दिली. तिने आमच्या श्वानाला ही गुंगीचे औषध दिले होते, परंतू सुदैवाने तो वाचला. नोकरीवर घेताना तिने तिच्या आईचा एक नंबर दिला होता. तिचा एक बॉयफ्रेंड ही होता जिच्याबरोबर ती लग्न करणार होती. परंतू मी त्याला संपर्क साधला असता मला काही माहीत नाही मी तिच्याबरोबर लग्न करणार नसल्याचे त्यांने सांगितले असे मनप्रितकौर म्हणाल्या.