📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——-
◆ मीरा-भाईंदर वसई -विरार आयुक्तालयचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची दै. मुंबई मित्र /वृत्त मित्र चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी घेतली भेट
◆ 100 कोटी खर्च करण्याची धमकी देणाऱ्या अर्शद चौधरीच्या संपत्तीची अार्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी: अभिजीत राणे
◆ अभिजीत राणे यांनी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचे मानले आभार
====
◆ आरोपींवर कशाप्रकारे अधिक कठोर शासन करता येईल याबाबतीत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा
◆ गुन्ह्याचा ‘मोटिव्ह’ बेकायदा बांधकामांचे संरक्षण
◆ वसई विरार महापालिकेचे वालिव व पेल्हार विभाग बेकायदा बांधकामांचे माहेरघर
——–
विशेष प्रतिनिधी, मीरा-भाईंदर
मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज दै.मुंबई मित्र /वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज भेट घेतली व त्यांनी केलेल्या सहकार्य बद्दल त्यांचे आभार मानले व त्यांचा शाल व पँथर ची प्रतिकृती देऊन सत्कार केला. 2 जुलै रोजी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दै.मुंबई मित्र चे वितरण करणाऱ्या अभिषेक तिवारीचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी संबंधित आरोपींवर कशाप्रकारे अधिक कठोर शासन करता येईल याबाबतीत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली.
‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांना मारून टाकू त्यासाठी 100 कोटी जरी खर्च करावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही व स्थानिक पत्रकार बि. के. पांडे याला ही मारून टाकू असे धमकी देऊन अभिषेक तिवारीला मारहाण केली होती. याबाबतीत पेल्हार पोलीस ठाण्यात 10 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम 127 (2), 129, 135, 138, 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 140 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी अपहरणकर्ता अर्षद चौधरी व त्याचा भाचा राकिब याला राहत्या घरातून अटक केली होती.
यासंपुर्ण प्रकरणात मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सर्व प्रकरण समजून त्याचे गांभिर्य ओळखून पेल्हार पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर सर्व सुत्रे हलली!
आज झालेल्या नियोजित बैठकीत अभिजीत राणे यांनी यावेळी अपहरणकर्ता अर्शद चौधरी व त्याच्या साथिदारांवर कठोर शासन करावे. तसेच 100 कोटी खर्च करण्याची धमकी देणाऱ्या अर्शद चौधरीच्या संपत्तीची अर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी करावी. याशिवाय अर्शद चौधरीवर मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय व मुंबई पोलीस हद्दीत विविध गुन्हे दाखल आहेत याची संपुर्ण माहिती आयुक्तांना देण्यात आली. अशाप्रकारचे अनेक गुन्हे पेल्हार परिसरात होत असून याचे मुख्य कारण बेकायदा बांधकामे असून प्रत्येक गुन्ह्याचा मुख्य उद्देश ‘मोटिव्ह’ बेकायदा बांधकामांचे संरक्षण करणे हाच असून त्यापध्दतीने तपासाचे आदेश देण्यासंदर्भातील निवेदन यावेळी अभिजीत राणे यांनी मधुकर पांडे यांना दिले व चर्चा केली.
वसई-विरार महानगर पालिकेच्या पेल्हार व वालिव परिसरात कशा पध्दतीने बेकायदा बांधकामे होतात? व आज यामुळे बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक भुमाफिया यापरिसरात जागा बळकावत असून लाखो स्कवेअर फुटांची बेकायदा बांधकामे करत आहेत. मागील 4-5 वर्षात अनेक भुमफियांकडे करोडो रुपये आले आहेत. हा पैसा कुठून आला? कशा पध्दतीने आला? यासंपुर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजचे असल्याचे अभिजीत राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.