📰 MUMBAI MITRA EXPOSE
——-
◆ “रेंटोला”कडून फ्रेंचायझीच्या नावाखाली मायरा बोरकर यांची 10 लाखांची फसवणूक?
◆ ‘रेंटोला इंडीया’ कंपनीचे मालक संदिप कुमार वाशी कार्यालयाचे प्रमुख सचिन तुपे व संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
◆ सचिन तुपे कडून बोरकर यांच्या घरी भेट
◆ अल्पेश नागवेकर व सचिन तुपे करारनाम्यात साक्षिदार
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
नालासोपारा येथील मायरा महेश बोरकर यांची ईलेक्ट्रीक रिक्शा विकणाऱ्या ‘रेंटोला इंडीया’ कंपनीकडून फ्रेंचायझीच्या नावाखाली तब्बल 10 लाखांची फसवूणक करण्यात आली आहे. याबाबतीत त्यांनी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे व ‘रेंटोला इंडीया’ कंपनीचे मालक संदिप कुमार व सचिन तुपे व संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.
मायरा बोरकर यांनी पुणेस्थित रेंटोला कंपनीची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात पाहिली होती त्यावरून त्यांनी कंपनीशी संपर्क साधला होता त्यावेळी त्यांना कंपनीचे वाशी येथे विभागीय कार्यालय असल्याचे समजले. मायरा यांनी त्यानंतर वाशी कार्यालयात भेट दिली तेव्हा कार्यालयीन प्रमुख सचिन तुपे याने त्यांना आपण 34 लाख रुपये भरावे त्याबदल्यात कंपनीकडून 3 व्हील रिक्षाच्या शोरुमचा संपुर्ण खर्च कंपनी करेल, दर महा भाडे कंपनीकडून देण्यात येईल, गाळ्याचे डिपॉझीट कंपनीकडून देण्यात येईल अशा विविध बाबींचे आश्वासन देण्यात आले. 26 ऑगस्ट 2023 रोजी कंपनी मालक संदीप कुमार व मायरा बोरकर यांच्यामध्ये करार झाला परंतू त्यावेळी संदीप कुमार तेथे उपस्थित नव्हता. याकारारावर अल्पेश नागवेकर व सचिन तुपे यांचे साक्षिदार म्हुणन नाव होते. 34 लाखांच्या बदल्यात पुढील 5 वर्ष कंपनी दर महा 2 लाख 25 हजार देईल असे सांगण्यात आले. मायरा यांनी त्यानंतर वाशी येथील कार्यालयात पहिला 2 लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर 28 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा 3 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.
त्यानंतर सचिन तुपे याने नालासोपारा येथे जाऊन बोरकर यांच्या घरी भेट दिली होती व पाहणी केली होती. त्यादरम्यान सचिन तुपे यांनी लोन करण्याचे बोरकर यांना सुचवले याबाबतची सर्व कागदपत्रे ही तुपे याने बनवली व स्टेट बँक ऑफ इंडीयामध्ये लोन साठी अपलाय करण्यात आले. लोन होण्यास वेळ लागत होता म्हणून कंपनीच्या मागणी वरुन मायरा यांनी 7 नोव्हेंबर 2023 रोजी पुन्हा 2 लाख 30 हजार रुपये ऑनलाईन कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. सचिन तुपेच्या सततच्या संपर्कामुळे मायरा यांनी तीन दिवसात 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा 2 लाख 70 हजार रुपये कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. लोन मात्र अखेर पर्यंत पास झाले नाही.
मायरा बोरकर यांनी शोरुम साठी दुकानमालकाबरोबर करार केला कंपनी पैसे देईल या अपेक्षेवर त्यांनी दुकान मालकाला 1 लाख 50 हजार रुपये डिपॉझिट दिले व त्यांच्या परिचयाच्या स्थानिक व्यक्तीस इंटेरियर चे काम दिले. काम सुरु झाले परंतू कंपनीचे पैसे काही आले नाहीत तो भुर्दंड ही मायरा यांनाच बसला ज्यामध्ये त्यांना 2 लाख 50 हजार द्यावे लागले.
आपली फसवणूक झाली असे समजताच मायरा यांनी कंपनीकडे पैशासाठी तगादा लावला. परंतू 20 डीसेंबर पर्यंत काहीच झाले नाही त्यानंतर कंपनीचे नाव बदलणार आहे असे सांगून काही दिवस ढकलण्यात आले. परंतू पैसे काही मिळाले नसून मायरा यांना आपली फसवूणक झाली असल्याचे समजले व त्यांनी याबाबतीत ‘दै. मुंबई मित्र’कडे आपली लेखी तक्रार दिली. ‘दै.मुंबई मित्र’ने याबाबतीत सचिन तुपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. कंपनीच्या ओपन फेसबुक अकाऊंट वर संपर्क साठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता नंबर अस्तिवात नसल्याचे समजले. यावर आता राज्य सरकार व पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
