📰 MUMBAI MITRA FOLLOW UP
——
◆ ‘उरण’ हत्याकांडावर भाजपा आक्रमक
◆ सोमय्या, वाघ, राणेंचा लव्ह जिहाद चा आरोप!
◆ पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबाची घेतली भेट
◆ लव्ह जिहाद | लेन जिहाद | व्होट जिहादची आक्रमता वाढली
——
> नुसते मोर्चे काढून काही साध्य होणार नाही. आपल्या मुलींना वाचवण्यासाठी पुढाकार आपणच घेतला पाहिजे“ असेही त्या म्हणाल्या. ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: या घटनेवर लक्ष ठेवून आहे. ते पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत’
> -चित्रा वाघ, अध्यक्ष, भाजपा, महिला मोर्चा
> हा प्रकार लव्ह जिहाद मधून झाला आहे. राज्यात वेगाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आणि व्होट जिहादची आक्रमता वाढत आहे
> -किरीट सोमय्या, माजी खासदार
राज्यात लव्ह जिहाद असल्याचा हा पुरावा आहे. उरणमधील माझ्या बहिणीने धर्मांतर केले नाही म्हणून ही अवस्था केली. त्या जिहाद्याला जी काही शिक्षा द्यायची आहे, त्यासाठी आमचे हिंदुत्ववादी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोठेही कमी पडणार नाही.
> -नीतेश राणे, आमदार
——
विशेष प्रतिनिधी, उरण
नवी मुंबईतील उरणमधील यशस्वी शिंदे (नाव बदलेले) या 22 वर्षीय युवतीच्या हत्येवरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ, किरीट सोमय्या यांनी उरणमध्ये पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली. ही हत्या लव्ह जिहादमधूनच झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या घटनेवरून लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद आणि व्होट जिहादची आक्रमता वाढल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ही घटना वेदनादायी असल्याचे सांगितले. यशस्वी शिंदे या युवतीच्या हत्या कशी झाली, याचा तांत्रिक मुद्यांच्या आधारे उलगडा केला आहे. घटनेतील आरोपी कसा पळून गेला हे देखील माहीत आहे. गुन्ह्यातील आरोपी स्थानिक नसून तो कर्नाटकचा आहे.
यशस्वी शिंदे या युवतीची हत्यात एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. पीडितेचे दाऊद शेख हिच्याशी प्रेमसंबंध होते. पीडितेच्या वडिलांनी या दाऊद शेखवर 2019 मध्ये हल्ला देखील केला असल्याचे समजते. याला पोलिसांकडून दुजोरा मिळतोय. यशश्री शिंदेला दाऊद शेख गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता.
हे दोघे 2019 मध्ये एका कंपनीत कामाला होते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्री होती. यातूनच पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेख याच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन असल्याने पोलिसांनी दाऊद शेखविरोधात पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता. जामीन मिळाल्यानंतर तो कर्नाटकात गेला. त्यानंतर देखील दाऊद आणि यशश्री संपर्कात होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. पुढील तपास चालू आहे.