📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE
——
◆ प्राणी प्रेमी संस्थांकडून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
——
प्रतिनिधी, मुंबई
मुलुंड लिंक रोड मध्ये रेबिजसारख्या आजारापासून भटक्या कुत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी या एकदिवसीय शिबीरीचे आयोजन करण्यात आले. प्राण्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संस्था (ओआयपीए), अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) तसेच प्लाण्ट एण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी मुंबई (पॉज – मुंबई) या प्राणीप्रेमी संस्थांनी लसीकरण मोहिमेसाठी पुढाकार घेतला. भटक्या 50 कुत्र्यांना रेबिजची लस दिली गेली. ही मोहिम पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राहुल मेश्राम, पशु कल्याण अधिकारी सुनिष सुब्रमण्यन आणि निशा कुंजु यांच्या
मार्गदर्शनाखाली पार पडली. प्राणी प्रेमी ओंकार मोरे आणि फिडेला फेलिसिया वरेल भटक्या कुत्र्यांना पकडण्यात मदत कले.
