📰 MUMBAI MITRA EXPOSE
——
◆माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग युवराज सिंग, सुरेश रैना, गुरुप्रीत मान यांनी केला दिव्यांगाचा अपमान
◆धडक दिव्यांग-मूकबधीर युनियनचा तीव्र आंदोलनाचा इशारा
—-
> दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 92 नुसार तीन ही खेळाडूंवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. नाही तर असा प्रकार पुन्हा पुन्हा घडत राहील.
> -अभिजीत राणे
> संस्थापक अध्यक्ष, धडक कामगार युनियन महासंघ
—-
> आमच्या बांधवाची अशी चेष्टा मस्करी आम्ही कदापिही सहन करुन करुन घेणार नाही धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियनच्या माध्यमातून आम्ही याबाबतीत वेळपडल्यास राज्यव्यापी आंदोलन करु.
> -महेश पवार
> युनीट अध्यक्ष, धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरुप्रीत मान यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी नवी दिल्लीतील अमर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी ‘धडक कामगार युनियन महासंघ’ अंतर्गत येणाऱ्या ‘धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन’चे संस्थापक अध्यक्ष
अभिजीत राणे यांनी केली आहे. अन्यथा या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन’चे युनिट अध्यक्ष महेश पवार यांनी दिला आहे. याप्रकरणी क्रिकेटपटूं व्यतिरिक्त मेटा इंडियाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नवी दिल्लीतील अमर कॉलनी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाच विकेट्सने पराभव केल्यानंतर, माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये युवराज सिंग, हरभजन सिंग तसेच रैना लंगडत येताना आणि त्यांच्या शरीरावर सामन्याचा शारीरिक प्रभाव दाखवण्यासाठी त्यांची पाठ धरताना दिसत आहेत. दिव्यांगांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांनी या व्हिडिओला घृणास्पद म्हटले आहे. या व्हिडिओला ‘धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन’ने पूर्णपणे आक्षेपार्ह म्हटले आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, सोशल मीडिया त्याच्या वापरकर्त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे अपमानजनक व्हिडिओचा प्रसार होऊ शकला. हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाच्या कलम 21चे घोर उल्लंघन आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की, ‘हे दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 92 आणि निपुण मल्होत्रा विरुद्ध सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (2004 एससीसी ऑनलाइन एससी 1639) प्रकरणात स्थापन केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करते. या क्रिकेटपटूंची साधी माफी पुरेशी नाही, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे,’ असेही तक्रारीत म्हटले आहे.
क्रिकेटपटूंव्यतिरिक्त मेटा इंडियाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेटा-मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अशी पोस्ट करण्याची परवानगी देऊन माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 चे उल्लंघन केल्याचाआरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नवी दिल्लीतील अमर कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार झाली असून प्रकरणाच्या पुढील तपासासाठी ती जिल्ह्यातील सायबर सेलशी सामायिक केली जाणार असल्याचे कळते.
